संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– जिजाऊ रथयात्रा दि. १८ मार्च ते १ मे २०२५
कन्हान :- मराठा सेवा संघा व़्दारे ” जिजाऊ रथयात्रा २०२५ ” मराठा जोडो अ़भियान हे वेरूळ येथुन प्रारंभ होऊन महाराष्ट्रात ४५ दिवस भ्रमण करून लाल महाल पुणे येथे समापन करण्यात येणार असुन नागपुर जिल्हयात आगमण होताच भव्य स्वागत करण्याकरिता नागपुर जिल्हा पदाधिका-यांनी बैठक घेऊन कन्हान कामठी येथील पदाधिका-यांची बैठक घेऊन भव्य स्वागत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
रविवार (दि.२३) मार्च ला मराठा सेवा संघ कन्हान कार्यालय राम नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड नागपुर जिल्हाध्यक्षा शिवमती स्वाती शेंडे यांच्या अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी संगीतसुर्य केशवराव भोसले संगीत कक्ष अध्यक्षा संजीवनी सोमवंशी, शिवश्री अशोक डहाके, संभाजी ब्रिगेड नागपुर शहराध्यक्ष प्रताप पटले, ग्रामिण अध्यक्ष संजय कानतोडे, मराठा सेवा संघमौदा तालुकाध्यक्ष ईश्वर डहाके आदीच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रमाता जिजाऊ, शिवराय व महापुरूषाच्या एकत्रित प्रतिमेला पुष्पहार वाहुन जिजा़ऊ वंदन घेऊन बैठकी ची सुरूवात करण्यात आली.
स्वाती शेंडे यानी जिजा ऊ रथयात्रा नागपुर जिल्हयात भंडारावरून (दि.१३) एप्रिल २०२५ ला मौदा शहरात आगमण होऊन पुढे कुही नंतर उमरेड वरून रात्री नागपुर येथे (दि.१४ व १५) ला नागपुर शहरात भ्रमण करून (दि.१६) अप्रिल ला नागपुर वरून सका़ळी ९ वाजता कामठी, १० वाजता कन्हान नंतर पारशिवनी, खापा, सावनेर, काटोल मार्गक्रमणाची माहिती दिली. तंदनंतर चर्चा करून कामठी चे एकनाथ लांजेवार, आय रहमान, कन्हान चे शांताराम जळते, ताराचंद निंबाळकर यांनी सहकारी पदाधिकारी, सदस्यासह स्वागताची जिम्मेदारी स्विका रून कामठी, कन्हान व पारशिवनी मध्ये जिजाऊ रथ यात्राचे स्वागत, सत्कार करण्याची हमी घेतली. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा शिवमती माया इंगोले, लता जळते, शिवश्री ताराचंद निंबाळकर, शांताराम जळते, मोतीराम रहाटे, वसंतराव इंगोले, राजेंद्र गाढवे, एकनाथ लांजेवार, आय रहमान, प्रभाक रराव घंटा, दिवाकर इंगोले, राकेश घोडमारे, अमोल डेंगे, योगराज अवसरे आदी सह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड चे सदस्य बैठकीस उपस्थित होते.