संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – विश्व शांतीचे जनक, जगातील पहिले शास्त्रज्ञ, मृत्यू हे अंतिम सत्य असल्याचे जाहीर प्रति पादन करीत विज्ञानवादी विचारसरणी जनमानसात रूजविणारे, महिला पुरूष समानतेचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची २५६६ वी जयंती व बुध्द पोर्णिमा कन्हान परिसरात विविध संस्था व्दारे अत्यंत थाटामाटात साजरी करण्यात आली.
कन्हान शहर विकास मंच
तथागत गौतम बुध्द यांची जयंती व बौद्ध पौर्णिमा निमित्य गणेश नगर येथील कन्हान बुद्ध विहारात कन्हान शहर विकास मंच द्वारे गौतम बुध्द यांची २५६६ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली.
सोमवार (दि.१६) मे २०२२ ला कन्हान शहर विकास मंच व्दारे तथागत गौतम बुध्द यांची जयंती व बौध्द पोर्णिमा गणेश नगर येथील कन्हान बौध्द विहारा त कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रूंघे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण व बुद्ध वंदना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उपस्थित सर्व मंच पदाधि का-यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभि वादन करीत गौतम बुध्द जयंती व बौद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर , अनुराग महल्ले, हरीओम प्रकाश नारायण, वैभव थोरात, हिमांशु डाफ सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वधर्म समभाव संघटन कन्हान
सर्वधर्म समभाव संघटन कन्हान द्वारे बौद्ध पौर्णिमा निमित्य गांधी चौक कन्हान येथे कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व बुद्ध वंदना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी उपस्थिताना मार्ग दर्शन करून परिसरात नागरिकांना बुंदीचे वितरण करून गौतम बुध्द यांची जयंती व बौद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी राहुल रंगारी , प्रशांत मसार, पंकज गजभिये, चंदन मेश्राम, गणेश खांडेकर, विनोद मसार, अविनाश हातागळे, अकरम भाईजान, अक्षय फुले, कुंदन रामगुंडे सह नागरिक उपस्थित होते.
टेकाडी येथे बौद्ध पौर्णिमा थाटात साजरी
टेकाडी येथील मंगेश काठोके यांच्या घरा समोरील मंदिर परिसरात बुद्ध पौर्णिमा निमित्य सामुहिक बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मंगेश काठोके यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतीय संविधा नाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति मेला माल्यार्पण करून “जगाला युध्दाची नव्हे तर केवळ आणि केवळ शांतीचे जनक तथागत बुद्धांचीच गरज असल्याचे ” मंगेश काठोके यांनी उपस्थित नाग रिकांना संबोधित केले. तदंतर सामुहीक बुद्ध वंदना करून बौद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी पार्बता भेलावे, प्रमिला काठोके, कलावती सोनटक्के, सविता कश्यप, तुळसाबाई, फुलनबाई उंदेरीया, कमलबाई धोटे, शीतल पुंडे, प्रमिला बागडे, लक्ष्मीताई कोलते, सुरेश हुड, शुभम राऊत, अनिल हुड , विकास भलावी, शुभम वकलकर, स्वदेश भोवते, सारंग हुड, कुणाल काठोके, मंगेश सोनटक्के, गणेश हुड, अमित इंगळे, पंकज हुड, आशिष थोटे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
वराडा येथे बौद्ध पौर्णिमा थाटात साजरी
जय भीम मंडळ वराडा द्वारे बौद्ध पौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित डॉ. ए. एम. गोंडाणे, जि प सदस्य व्यंकटेश कारेमोरे, वराडा ग्रा पं सरपंचा विद्याताई चिखले, माजी सभापती देविदास जामदार यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे ला पुष्पहार अर्पण व बुध्द वंदना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बौद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली. याप्रसं गी नारायण पाटील, गुलाब मेश्राम, पितांबर मेश्राम, शामराव गजभिये, लिलाधर पाटील, सुभाष पाटील, रमेश पाटील, हर्षल नेवारे, अनिता पाटील, ज्योती मेश्राम, सुलोचना पाटील, विद्या रामटेके सह ग्रामस्थ नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.