संदीप कांबळे,कामठी
– कुटुंबातील सदस्यांनी केला घातपाताचा आरोप
कामठी ता प्र 12:- कामठी कन्हान मार्गावरील पुलावरून नदीत पडून एका विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजता उघडकीस आली असून मृतकाचे नाव अमित किशोर गवरे वय 31 वर्ष राहणार बेझनबाग नागपूर असे आहे.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक अमित किशोर गवरे वय 31 राहणार बेझनबाग नागपूर याचे सासर पारशिवणी तालुक्यातील कन्हान येथील असून मृतकाची पत्नी व दोन मुली चार दिवसापूर्वी कन्हान येथील सासरला आले होते .मृतक अमित किशोर गवरे हा एक्टिवा गाडी क्रमांक एमएच 49 एए 7390 ने मंगळवारला दुपारी बारा वाजता सुमारास कन्हान येथिल सासरला पत्नी व मुलींना भेटण्यासाठी आला होता दिवसभर सासर व कन्हान येथील इतर नातेवाइकांना भेटू या बेतात त्याची एक्टिवा गाडी एका दुकानासमोर लॉक करून निघून गेला मध्यरात्री कन्हान वरून कामठी येत असताना येत असताना पुलावरून कन्हान नदीत पडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे .सकाळी दहा वाजता सुमारास काही नागरिकांना तरुणांचे मृतदेह दिसून आले असता त्यांनी घटनेची माहिती कन्हान पोलिस स्टेशनला दिली घटनास्थळ हे स्थळ नवीन कामठी पोलिस स्टेशनला येत असल्याने नवीन कामठी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक किशोर मोतीगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पिल्ले, राजू टाकळीकर यांनी सहकार्यांसोबत घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करीता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले घटनेची माहिती नागपूर येथिल मृतकाचे भाऊ व आई-वडिलांना नागपूर येथील नातेवाइकांना दिली असता नातेवाईक घटनास्थळी आले त्यांनी मृतकाचीओळख पटवली मृतकाच्या डोक्याला जबर मार लागला असून बाकी खर्चट आहे पुलावरून पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने अमित गवरेचा झाला असल्याचा पोलिसांनी सांगितले असून नवीन कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतीगे करीत आहेत बॉक्स:;अमित किशोर गवरेचा अपघाती मृत्यू नसून घातपात झाला असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाइकांनी केला असून पोलिसांनी योग्य तपास करून न्याय देण्याची मागणी मृतकाच्या भाऊ आई वडिलांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे
कन्हान पुलावरून नदीत पडून तरुणाचा मृत्यू.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com