कांचन गडकरी असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटलच्या अध्यक्षपदी 

– वार्षिक सभेत नागपूरच्या कार्यकारिणीची निवड

नागपूर :- असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल नागपूर यांची वार्षिक आमसभा सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी मातृसेवा संघ महाल रुग्णालय येथे संपन्न झाली. सभेमध्ये वार्षिक अहवाल, लेखाजोखा, ताळेबंद, बजेट इत्यादी विषयांवर चर्चा झाली. तसेच असोसिएशनच्या नव्या कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तर डॉक्टर सुनीता महात्मे उपाध्यक्ष, जगदीश गुप्ता महासचिव, ऍड. पी. जी. घाटोळे कोषाध्यक्ष, माधुरी भोस्कर यांची सहसचिव म्हणून निवड झाली. तसेच म्युर मेमोरियल हॉस्पिटल, निंबूनाबई तिरपुडे हॉस्पिटल, जनता हॉस्पिटल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल, भवानी हॉस्पीटल आणि मातृ सेवा संघ सीताबर्डी हॉस्पिटल यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी कार्यकारीणीत असणार आहे.

कांचन गडकरी म्हणाल्या, ‘धर्मादाय रुग्णालयांना शासनाने तसेच कॉर्पोरेट कंपन्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सोयीसुविधा उभारण्याकरिता मदत केली पाहिजे.’ असोसिएशनची बैठक दर तीन महिन्यांनी होणार आहे. यात कामाचा आढावा घेण्यात येईल. विलास शेंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी CEO) या पदावर सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Governor inaugurates 64th Art Exhibition; Laxman Shreshtha given Vasudeo Gaitonde Lifetime Achievement Award

Wed Feb 5 , 2025
Mumbai :- Maharashtra Governor C P Radhakrishnan inaugurated the 64th Maharashtra State Art Exhibition (Artist Category 2024-25) at Jehangir Art Gallery in Mumbai on Tue (4 Feb). The Governor presented the Vasudeo Gaitonde Art Lifetime Achievement Award to senior abstract painter Laxman Shreshtha. The Governor also presented the Senior artist award to Shakuntala Kulkarni. The award was accepted on her […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!