संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-मागच्या दोन वर्षांपूर्वी सन 1994 च्या पावसाच्या पुरसदृश्य स्थितीची झाली होती पुनरावृत्ती..
कन्हान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील आजनी, बीडबिना, सोनेगाव राजा गावाला पुराणे वेढले होते…
सोनेगावराजा येथील 350,तर बीडबिना येथील 36 नागरिकांना रेस्क्यू पथकाने बोटी ने सुरक्षित बाहेर काढले होते…
कामठी ता प्र 27 :- दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात कामठी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने त्यावर्षीच्या पावसाची सरासरी ओलांडली होती तर सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पेंच प्रकल्पातील पाण्याचा वेढा वाढल्याने नाईलाजास्तव पेंच चे सोळा दरवाजे उघडण्यात आले होते परिणामी हा जलाशय कन्हान नदीत विसर्ग झाल्याने कन्हान नदी फुगल्याने या नदी काठावरील कामठी तालुक्यातील गावांना पुराचा धोका निर्माण होत कामठी तालुक्यातील कन्हान नदी काठावरील बीडबिना, व सोनेगावराजा गावाला पुराणे वेढले होते तसेच दोन्ही गावाना बेटाचे रूप प्राप्त झाले होते. सोनेगावराजा येथे 350 तर बीडबिना येथे 36 नागरिक पुरात अडकले होते दरम्यान एसडीओ श्याम मदणुरकर व तत्कालीन तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या तालुका प्रशासणाच्या वतीने त्वरित दखल घेऊन जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकाने रेस्क्यू ने बोटी ने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश गाठले होते तेव्हा नैसर्गिक आपत्तीचा फटका लागत यावर्षीसुद्धा मागच्या वर्षीच्या अतिवृष्टीची पुनरावृत्ती न व्हावी व प्रशासनाची एकच तारांबळ न होता नागरिकांचा जीव मुठीत न यावा यासाठी नियोजित पद्ध्तीने खबरदारी घेण्याच्या पूर्व उपाययोजना म्हणून कामठी तहसील कार्यालयच्या तालुका शोध व बचाव पथकास आपत्ती प्रतिसाद दल एसडीआरएफ मार्फत आज 27 मे ला सकाळी 10 वाजेपासून सोनेगाव राजा येथे कन्हान नदीवर प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी हे प्रशिक्षण तहसिलदार अक्षय पोयाम,नायब तहसीलदार बमनोटे, नायब तहसीलदार अमर हांडा , मंडळ अधिकारी महेश कुलदिवार, मंडळ अधिकारी संजय कांबळे, सोनेगाव राजा ग्रा प चे सरपंच, नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी वर्ग व मोठ्या प्रमाणात असलेल्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले..