कामठीत आयपीएल चा सट्टा तेजीत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा जोमात गाजत असून यामध्ये कामठीत आयपीएल मधील प्रत्येक सामन्यावर लाखो रुपयाचा सट्टा खेळला जात असून येथील सट्टा माफिया च्या माध्यमातून या सट्टा व्यवसायिकाचा धंदा तेजीत सुरू आहे मात्र पोलीस विभाग मिळत असलेल्या चिरीमिरी मुळे बघ्यांची भूमिका घेत डोळे मिटून बसले आहेत तेव्हा या आयपीएल च्या सटोरी बाजावर कारवाही होईल काय?या चर्चेला उधाण आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे तर दुसरीकडे आयपीएल चा महासंग्राम सुरु आहे.पोलीस विभाग या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे संधी साधत क्रिकेट सटोडीयानी आयपीएल च्या सामन्यावर खायवाडी सुरु केलेली आहे.ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या या सट्टाकडे तसेच क्रिकेट सटोडीयाकडे स्थानिक पोलीस सह ,डी बी स्कॉड व डीसीपी स्कॉड चे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. यामध्ये या विभागाचा अर्थकारण ही जुळले असल्याचा आरोपही शहरातील नागरिक करू लागले आहेत.

आयपीएल स्पर्धेमुळे क्रिकेट विश्वाचे रूप पालटले या स्पर्धेच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण क्रिकेटविश्वात होते. आयपीएल स्पर्धेवर खेळल्या जाणाऱ्या सटट्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते ज्याचे सूत्र कामठीत सुद्धा जुडले असून शहरात आयपीएल स्पर्धेवर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांची साखळी तयार झाली आहे .मोबाईल, संगणक च्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडलेले असतात एवढेच नव्हे तर व्हाट्सएप चा माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभावी सट्टेबाजी सुरू आहे. कामठी पोलीस स्टेशन हद्दीत कित्येक वस्त्यांची गर्भश्रीमंतांची वस्ती म्हणून ओळख आहे तर यामध्ये शहरातील उचभ्रू तसेच व्यावसायिक वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे तसेच यातील बहुतांश वर्ग हा सट्टेबाजीत गुंतलेला असून गुप्तचर रित्या मोठ्या प्रमाणात सट्टा व्यवसाय करीत आहेत आणि या प्रकारच्याच व्यवसायासाठी म्हणून सत्ताधारी राजनेत्याचे संरक्षण पाठीशी घेतात व राजकीय पाठबळाचा पुरेपूर फायदा घेत असतात. सट्टा खेळणारा आणि सट्टा घेणारा सट्टेबाज यांच्यातील सर्व व्यवहार मोबाईल च्या माध्यमातून होत असतो. सट्टा घेणाऱ्याला बुकी म्हणतात तर बुकीला प्रत्यक्ष न भेटता सर्व व्यवहार केवळ विश्वासावर केले जातात तर ज्या ठिकाणी सट्टा घेतला जातो तेथे दूरचित्रवाणी संच आणि दहा ते पंधरा मोबाईल असतात .सामन्यातील प्रत्येक चेंडू, धावा, चौकार,आणि शटकावर सट्टा खेळला जातो प्रत्येक सामण्यानुसार सट्टा भाव ठरतो .एक रुपयांना दहा रूपये असा भाव असतो काही सामन्यात कमकुवत संघावर सट्टा खेळल्यास तो संघ विजयी झाल्यावर एका रुपयावर पन्नास ते शंभर रूपये भाव देण्यात येत असतो .हा सट्टा बहुतांश तरुण वर्ग तसेच व्यावसायिक वर्ग हे बहुधा बिअर बार तसेच हॉटेल वा टिव्ही समोर बसून घरूनच सट्टा लावण्याचा सपाटा सुरू आहे तर पोलिस विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते तर तरुण पिढी तसेच या क्रिकेट सट्टा व्यावसायिक विशेषता बिअर बार मध्ये मद्यप्राशन च्या नावाखाली सट्टा लावून स्वतःच जीवन उध्वस्त करीत असल्याचा प्रकार दिसून येतो मात्र संबंधित पोलीस विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष पुरवीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गांजा बाळगणाऱ्या आरोपींना अटक

Sat Mar 30 , 2024
नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, नविन काटोल नाका चौक येथे एक ईसम गांजा विकीकरीता घेवुन येणार आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन गांजा विकीकरीता आलेला आरोपी नामे १) अभिषेक देवशंकर वर्मा वय २५ वर्ष रा. येरला, कळमेश्वर, जि. नागपूर, तसेच खरेदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com