संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 15: – कोरोना संकट निवारल्याने दोन वर्षानंतर कामठी तालुक्यात सर्वत्र 14 एप्रिल ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता.मोठ्या उत्साहात भीमजयंती साजरी करण्यात आली तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी काढलेल्या भीमजयंती मिरवणूकित हजारोच्या वरील अनुयायांचा सहभाग होता तर दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीचा स्वागत करत असलेले सांगोडकर कुटुंबीयांतर्फे 131 किलो चा केक कापून मिरवणुकीतील अनुयायांना केक वितरित करून भीमजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कोरोनामुळे दोन वर्षे सण उत्सवावर निर्बंध लादले होते त्यामुळे गेली दोन वर्षे अतिशय साध्या पद्धतीने भीमजयंती साजरी करण्यात आली होतो.मात्र कोरोना संकट दूर झाल्याने यावर्षी मात्र भीमजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
14 एप्रिल परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात निळमय धार्मिक वातावरण निर्माण झाले असल्याने जागोजागच्या विहार समिती तसेच अनुयायांच्या वतीने भीमजयंती महोत्सव साजरा करण्यात आला.दरम्यान विविध स्पर्धा, रक्तदान शिबिर, आरोग्य निदान शिबिर, मॅरोथॉन आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.तर 13 एप्रिल च्या रात्री 12 वाजताच केक कापून बाबासाहेबांना मानवंदना देत सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती तर दिवाळीपेक्षाही अधिक फटाक्यांचो आतिषबाजी झाल्याचे सांगण्यात आले.14 एप्रिल ला विहारा विहारात बुद्ध वंदना करीत बाबासाहेबांना मानवंदना वाहण्यात आली तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सायंकाळी 7 वाजता विविध विहार समिती तसेच अनुयायांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली.ही मिरवणूक प्रबुद्ध नगर येथून शुभारंभ करीत जयभीम चौक, गवलीपरा, जयस्तंभ चौक, दुर्गा चौक, हरदास नगर, हैदरी चौक, मोटर स्टँड चौक भ्रमण करीत जयभीम चा गाजावाजा करीत ज्यस्तसंभ चौक स्थित डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत मिरवणूकीचे समापन करण्यात आले.या मिरवणुकीचे वंचित बहुजन आघाडी कामठी शहर, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, टिळक गजभिये कुटुंब , तसेच सांगोडकर कुटुंबियासह इतर सामाजिक संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. ही मिरवणूक यशस्वीरीत्या पार पडावे यासाठी पोलीस विभागाच्या वतीने ठिकठिकानी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
कामठीत भीमजयंतीचा जल्लोष, भव्य मिरवणूक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com