– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 27: – संपूर्ण विदर्भात सर्वात मोठे शासकीय उपजिल्हा म्हणून ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकोय उपजिल्हा रुग्णालयाची नोंद आहे.50 खाटाहून 100 खाटांचे झालेले हे रुग्णालय आधुनिक पद्धतीने वैद्यकीय उपचारासह आरोग्य सेवा पुरवाव्या असे अपेक्षीत असताना या रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी प्रकार, आर्थिक लूट, अपमानास्पद वागणूक अशा कित्येक समस्येला कंटाळून नागरिकांच्या हितार्थ न्यायिक मागण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ,वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया , राष्ट्रीय मजदूर सेना , कामठी महिला संघ कामठी च्या संयुक्त विद्यमाने उद्या 28 फेब्रुवारी ला दुपारी 12 वाजता कामठी तहसील कार्यालय सामोर भव्य नारे प्रदर्शन आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व विजय पाटील, अनावरुल हक पटेल, विद्याताई भीमटे करणार असून या आंदोलनातून स्त्री रोग विषेशज्ञ डॉ शीतल गजघाटे यांना त्वरीत निलंबित करणे, सर्व रोगावर उपचार कामठी च्या शासकिय उपजिल्हा रुग्णालयातून व्हावा, या शासकोय रुग्णालयात अति दक्षता विभाग त्वरित सुरू करण्यात यावा, या शासकोय उपजिल्हा रुग्णालयाला बाबू हरदास एल एन हे नाव देण्यात यावे, रुग्णाला लागणारा औषधोपचार हा रुग्णालय च्या वतीनेच करण्यात यावा, विविध रोगाचे विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करने, रुग्णाना होणारी रेफर टू नागपूर ची पद्धत बंद करण्यात यावी, रुग्णालयात होणारा आर्थिक भ्रष्टाचार त्वरित थांबविण्यात यावा अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
तेव्हा या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येतील नागरिकांनी सहभाग दर्शवावा अशी मागणी आंदोलनकर्ते सह मजहर इमाम, प्रोफेसर दुर्योधन मेश्राम, अर्चना ताई सोमकुवर,शितल बरबटे, अफजल करिमी , मो शाहिद अजमल, तलत हकीम, शहजाद पटेल आदींनी केले आहे.
कामठी तहसील कार्यालय समोर भव्य नारे प्रदर्शन आंदोलन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com