संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 28:-कामठी तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मोकाट श्वानांचा वावर वाढला असून त्या मोकाट कुत्र्यावर पार्वो व्हायरस चा संसर्ग होत आहे तसेच पाळीव कुत्र्यातही गॅस्ट्रो सारख्या रोगासह पार्वो व्हायरस चा संसर्ग वाढत आहेत.या संसर्ग झालेल्या कुत्र्यावर वेळीच उपचार न झाल्यास मोकाट श्वानांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहेत.
कामठी च्या पशु वैद्यकीय रुग्णालयात दररोज दोनच्या वर आजारी कुत्र्यामध्ये गॅस्ट्रो तसेच पार्वो व्हायरस या विषाणूची लक्षणे दिसून येत आहेत.याशिवाय मोकाट श्वानामध्ये खरुजची लागणही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.खरुजमुळे कुत्र्यांच्या अंगावरील केस गळती होऊन श्वान विद्रुप होत आहेत.तेव्हा संबंधित विभागाने यावर उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
कामठी तालुक्यातील कुत्र्यावर पार्वो व्हायरस चा संसर्ग
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com