कामठी पंचायत समिती सभापती -उपसभापती ची निवडणूक 15 आक्टोबर ला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  येत्या १५ ऑक्टोंबरला दुपारी दोन वाजता सभापती व उपसभापतींची निवडणूक होणार असून १० तारखेला नागपूरला याबाबत आरक्षण निश्चित केल्या जाणार आहे.

आठ सदस्य असलेल्या कामठी पंचायत समितीमध्ये २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये चार काँग्रेस तर चार भाजपचे सदस्य निवडून आल्याने सभापती व उपसभापतींची निवडणूक चांगलीच रंगली होती सभापती पदावर ईश्वर चिठ्ठीने भाजपचे उमेश रडके निवडून आले होते तर उपसभापती पदी आशिष मल्लेवार निवडून आले होते यांचा कार्यकाळ जुन महिन्यात संपुष्टात आला. ओबीसीचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने नवीन सभापती व उपसभापतीची निवडणूक करण्यात आली नाही अखेर तालुक्यातील दोन पंचायत व दोन जिल्हा परिषद सदस्यासाठी निवडणूक घेण्यात आली यात भाजपचे एक सदस्य कमी झाले कामठी पंचायत समिती मध्ये २०१७ च्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसकडे चार चार सदस्य होते. उपचुनाव नंतर आता मात्र काँग्रेसकडे पाच तर भाजप कडे तीन सदस्य आहेत. येणारा सभापती हा काँग्रेस पक्षाचा निवडून येणार असल्याची दाट शक्यता आहे. उमेदवार निवडीचे अधिकार पूर्व जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्याकडे असणार असल्याचे बोलले जात आहे तरी सुद्धा काँग्रेस कुणाला उमेदवार बनविणार हे येत्या १० तारखेला होणाऱ्या आरक्षण प्रक्रियेनंतर कळणार आहे.

उपचुनाव नंतर पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे पाच सदस्यामध्ये सुमेध मधुकर रंगारी, सोनू मनोज कुथे, दिशा छबिलाल चंद्रिकापुरे, दिलीप तुळशीराम वंजारी, आशिष मल्लेवार तर भाजपच्या तीन सदस्यांमध्ये उमेश भगवंतराव रडके, सविता रामचंद्र जिचकार, पूनम समीर मालोदे आहेत. पूर्वी दोन्ही पक्षाकडे चार -चार सदस्य असल्याने निवडणूक अटी-तटीची ठरली परंतु या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या फूट पडणार नसल्यास काँग्रेसचाच सभापती निवडून येणार हे मात्र नक्कीच.

१५ ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजता सुरू होणारी नामनिर्देशन प्रक्रियेपासून तर दुपारी २ वाजता पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सभापती पदाचे आरक्षण अनुसूचीत जातीच्या सर्वसाधारण वर्गाकरीता असल्यास काँग्रेसकडून सुमेध रंगारी तर महिला असल्यास दिशा चंद्रिकापुरे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

कित्येक वर्षानंतर सभापतीना मिळाले वाहन

राज्यातील पंचायत समिती सभापती करीता शासकीय निवासस्थान,चार चाकी वाहन या सुविधा असतात परंतु पंचायत समितीमध्ये वाहन नसल्याने सभापती व उपसभापती आपल्या खाजगी वाहनाने दौरा करीत असत तर गट विकास अधिकाऱ्यांच्या वाहनाने आवश्यक कामे आटोपत असत मात्र मागील आठवड्यात स्वतंत्र वाहन मिळाल्याने सभापतींनी आपला दौऱ्याचा झपाटा लावून धरला आहे. या वाहनावर नवीन वाहन चालकाची नियुक्ती पण करण्यात आली आहे. सभापतीचे शासकीय निवासस्थान तर आहे परंतु याचे उपयोग सभापती कमी तर अधिकारी जास्त करत आहेत. उमेश रडके यांनी पंचायत समितीला वाहन मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. रडके यांनी सांगितले की सभापती कोणीही किंवा कोणत्याही पक्षाचे असो ग्रामीण भागात दौरा करण्यासाठी वाहन नसल्याने त्रास होत असे परंतु आता वाहन मिळाल्याने दौरा होत आहे. ग्रामीण भागाची विकास यंत्रणा म्हणजे मिनी मंत्रालय समजले जाणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

10ऑक्टोबर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम यशस्वी करा - मुख्याधिकारी संदीप बोरकर

Sat Oct 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील एकही बालक जंतनाशक औषधीपासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य विभागासह इतर विभागाच्या सहाय्याने 10 ऑक्टोबर ला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम यशस्वी करा असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे. केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामठीत 10 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!