संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 15:- महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायत औद्योगिक नागरिक सुधारणा अधिनियमानुसार 2022 या राज्य शासनाच्या अधिनियमाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याने गॅझेट राजपत्र प्रसिद्ध झाले आहे .नवीन अधिनियम तरतुदीनुसार 10 मार्च रोजी कामठी नगर परिषद ची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती या प्रभाग रचना आराखड्यावर 17 मार्च पर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आले यानुसार काहींनी आक्षेप ची तयारी सुदधा दर्शविली आहे मात्र प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना रद्द समजावे यासंदर्भात राज्य शासनाने राजपत्रात स्पष्ट कले आहे व याच संदर्भातील निवडणूक आयोगाचे पत्र काल 14 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यामुळे 10मार्च ला कामठी नगर परिषद मे प्रसिद्ध केलेली प्रारूप प्रभाग रचना अवघ्या पाच दिवसात रद्द करण्यात आली आहे त्यामुळे प्रसिद्ध झालेली प्रारूप प्रभाग रचना पुन्हा बदलणार आहे.
ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहे त्यामुळे निवडणुका सहा महिने उशिरा होणार असे तर्क लावले जात आहेत.राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केलेल्या निर्देशानुसार कामठी नगर परोषद ने प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना रद्द होणार आहे.राज्य सरकारच्या सुचनेनुसार निवडणूक आयोग यापुढे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील .राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये यासाठी दोन्ही सभागृहात मांडलेले विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवीण्यात आलेल्या विधेयकावर राज्यपालाने स्वाक्षरी केली त्यामुळे नवीन अधिनियमानुसार राज्यातील महानगर पालिका, नगरपालिका प्रभाग रचना रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत यानुसार कामठी नगर पालिकेची प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना रद्द करण्यात येत आहे.
नव्याने होणार प्रभाग रचना–कामठी नगर परिषद ची प्रसिद्ध झालेली प्रभाग रचना अवघ्या पाच दिवसात रद्द करण्यात आली आहे वास्तविकता 10 मार्च ला प्रसिद्ध झालेली प्रारूप प्रभाग रचना अनेक इच्छुक उमेदवारांच्या सोयीचो तर काही उमेदवारासाठी गैरसोयीचो होतो .तर प्रभाग रचना रद्द झाल्याने नवीन प्रभाग रचना नेमकी कशी असणार याची उत्सुकता पुन्हा इच्छुक उमेदवारांना लागली आहे.
कामठी नगर परिषदची प्रारूप प्रभाग रचना रद्द
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com