कामठी नगर विकास कृती समिती,कामठीचे आजपासून आमरण उपोषण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर शहराचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहराला दोन दोन आमदार लाभूनही कामठी शहर अजूनही मूलभूत सोयी सुविधांसह विकासापासून वंचीत आहे .तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य जनतेच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित व रखडलेल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी कामठी नगर वासियाच्या वतीने कामठी नगर विकास कृती समिती,कामठीने राजकुमार उर्फ सुगत रामटेके यांच्या नेतृत्वात कामठी तहसील कार्यालय समोर आज 12 ऑगस्ट पासून आमरण उपोषण पुकारले आहे.याप्रसंगी जितू गेडाम, संघपाल गौरखेडे,गणेश आगाशे,उमेश भोकरे,मनोज धोटे, सतीश यादव,राजन बागडे ,दीपक वासनिक ,विदेश डोंगरे,आदी उपस्थित होते.

आमरण उपोषण पुकारलेल्या मागण्यात जयस्तंभ चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची पुनर्रचना करून सौंदयीकरण करणे,भूमिगत गटार योजनेतील आर्थिक अनियमितता करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी,कामठी शहरातून गिळंकृत केलेली औद्योगिक वसाहत (एमआयडीसी)ची पुनर्रचना करण्यात यावी,कामठी शहरातील खेळाडूंना मैदान उपलब्ध करून प्रस्तावित क्रीडा संकुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे,नवीन कामठी परिसरात नवीन बाजारपेठ राजश्री छत्रपती शाहू महाराज नावाने दर रविवारी आठवडी बाजार सुरू करण्यात यावा. नागपूर जिल्ह्याकरिता मंजूर वैद्यकिय महाविद्यालय कामठी शहरात प्रस्तावित करावा अथवा तेथे 500 खाटाचे अत्याधुनिक शासकोय रुग्णालय मंजूर करण्यात यावा,कामठी शहरातील विवादित शासकोय जमिनीवर शासन प्रशासन तर्फे बालोद्यान निर्माण करण्यात यावा.कामठी शहरातील लिज प्रकरणाचा त्वरित निपटारा करावा व अतिक्रमनधारी नझुल धारकांना मालकी हक्क द्यावा,कामठी शहरातील विभिन्न सार्वजनिक ठिकाणी स्त्रीयाकरिता स्वतंत्र सार्वजनिक शौचालय तयार करण्यात यावे,कामठी शहरातील पत्रकारासाठी तालुका पत्रकार भवन व पेपर विक्रेत्याना बसण्याची सोय निर्माण करून द्यावी,शहरात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कालावंतासाठी सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात यावी,मुख्याधिकारी नगर परिषद कामठी यांना जयस्तंभ च्या विटंबना प्रकरणी निलंबित करण्यात यावे तसेच त्यांच्या संपत्तीची सुद्धा पडताळणी करण्यात यावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Loyld Metal & Energy Limited Receives 5-Star Rating for Surjagarh Iron Ore Mine for the Second Consecutive Year

Mon Aug 12 , 2024
Nagpur/ Gadchiroli :- 12th August 2024 – Lloyd Metal & Energy Limited is proud to announce that our Surjagarh Iron Ore Mine has been awarded the prestigious 5-Star rating by the Ministry of Mines for the second consecutive year. The accolade was presented by Minister of Mines, G. Kishan Reddy, and Minister of State, Sathish Chandra Dubey, at a ceremony […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com