कामठीत चहापुर्वीच मिळतो दारूचा घोट

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 30 :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानल्या जाणाऱ्या कामठी तालुक्यातील शहराचा भाग हा नागपूर शहर पोलीस आयुक्तालय विभागात समावेश असून ग्रामीण भाग अजूनही ग्रामीण पोलिस विभागाशी जोडलेला आहे . तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात जोम आला असून पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध देशी व मोहफुल दारु विक्री ची दुकानात पहाटे पासून च विक्री होत असल्याने या दारूच्या व्यसनाला बळी पडलेली तरुणांई नशेच्या खाईत जाऊन स्वतःचे जीवन उधवस्त करीत आहे तर पोलीस मात्र फक्त स्वतःची झोळी भरण्यात धन्य आहे. यामुळे कामठी तालुक्यात ‘चहापूर्वीच मिळतो दारूचा घोट ‘ या चर्चेला उधाण आहे.तेव्हा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या माध्यमातुन या अवैध दारू विक्रीवर लगाम लागनार का?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करोत आहेत.
एकीकडे नागपूर शहर पोलीस आयुक्तालय चे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कारवाहिने नागरिकामध्ये पोलीसांचे कौतुक करण्यात येते मात्र काही पोलीसामुळे नागरिकांकडून पोलीस विभागाचे करणाऱ्या या कौतुकाला गालबोट लावण्यात येत आहे कारण काही भ्रष्ट पोलिसांना मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे याच पोलीस दादाकडून अवैध दारू विक्री व्यवसायिकांची पाठराखण केली जाते तर कामठी शहरातील नयागोदाम, येरखेडा,जयभीम चौक, बुद्धनगर, पासीपुरा, कामगार नगर, रमानगर, रामगढ, कुंभारे कॉलोनी, सैलाब नगर, छावणी, खलाशी लाईन, मचीपूल, कादर झेंडा,आदी भागात अवैधरित्या मोहफुल तसेच देशी दारु विक्री चा व्यवसाय सुरू असून रात्री कितीही वाजता गेले तरी यांच्याकडून दारू चा घोट मिळत असतो तर पहाटे पासूनच बिनधास्त पणे दारू विक्री करोत असल्याने जणू काय पोलिस विभागाने यांना परवाना दिला असेल असे परवानाधारक दारूविक्रेते असल्याचे गृहीत धरून दारू विक्री करोत असतात तर या दारूच्या आहारी गेलेले कित्येक तरुण मंडळी सकाळी उठून चहा घेण्यापेक्षा आधी या दुकानातून दारूचा घोट प्यायला जाऊन मनसोक्त करीत स्वतःच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत तर दुसरीकडे पोलीस दादा या अवैध दारू व्यावसायिकासोबत अर्थपूर्ण संबंध ठेवून पाठराखण करोत अप्रत्यक्ष दारू विक्रीचा परवाना दिल्याचे वर्तन करीत आहेत.तेव्हा या अवैध दारू व्यवसायिकांच्या मुसक्या बांधणार कोण?असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खापरखेडा येथे शिवालयात शिवजनमोत्सव साजरा

Wed Mar 30 , 2022
आकाश राऊत खापरखेडा प्रतिनिधी – खापरखेडा येथे शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपति शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले तसेच शिवरूद्र ढोल ताशा पथक यांच्या तर्फे मानवंदना देण्यात आली. व भव्य रक्तदान व रोग निदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!