नागपूर :- दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता कमला नेहरू महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती सुहासिनी बजारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे युवा लोकप्रिय आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रमुख उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
कार्यक्रमाच्य अध्यक्षा संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी वंजारी यांनी महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या देशभक्ती स्वातंत्र्ययोगदानाची माहिती दिली असे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यानी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वातंत्र्यप्राप्तीकरिता ‘करो या मरो’चा नारा देणारे महात्मा गांधी हे स्वातंत्र्यसेनानी होते भारतीय जनतेमध्ये अहिसेच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती निर्माण करून स्वातंत्र्य मिळण्याकरिता अनेक अहिंसात्मक आंदोलने त्यांच्या नेतृत्वात केली गेली. त्यानी स्वातंत्र्य प्राप्तीकरिता संपूर्ण जीवन देशाकरिता अर्पण केले. महात्मा गांधीसारख्या राष्ट्रप्रेमाची आज देशाला आवश्यकता आहे बापूचा देश म्हणून भारताकडे जागतिक स्तरावर आदराने पाहिले जाते तसेच ‘जय जवान जय किसान या नारा देणारे आणि मूर्ती लहान पण किर्ती महान असे लालबहादूर शास्त्री हे साधी राहणी व उच्च विचार असे आचरण करणारे व्यक्तीमत्व होते. शास्त्रीजीनी भारताला कणखर नेतृत्व दिले असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाला अमर सेवा महकाच्या अध्यक्षा सुहासिनी बजारी, संस्थेचे सचिव तथा आमदार अँड अभिजित बजारी, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता पंजारी यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप बडवाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्राध्यापक वासुदेव गुरनुले यानी केले.