संदीप बलवीर, प्रतिनिधी
– आई वडिलांसह बोरखेडी (रेल्वे)चे नाव उंचविले
नागपूर :- तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) येथे राहणारे फार्माशिष्ट अजय देशमुख यांची कन्या कामाक्षी देशमुख हिने आजच जाहीर झालेल्या बारावी सी बी एस सी बोर्डाच्या निकलात सुयश प्राप्त करीत 95% गुण मिळवीत बोरखेडी (रेल्वे ) गावासाह आईवडिलांचे नाव मानाने उंचविले.
फार्माशिष्ट अजय देशमुख यांनी आपल्या मुलीने शिक्षणात कुठेही मागे राहू नये म्हणून शिक्षणाशी कुठलीही तडजोड न करता तिला नागपूर येथे ठेवत शहरातील महागाडी अशी शाळा अत्रे ले आउट येथील स्कुल ऑफ स्कॉलर येथे शिकविले.मुलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी स्वतः प्रेरित करून त्यांच्याकरिता शिक्षणाचे सर्व दालने उघडी करून दिली.त्यामुळेच कामाक्षी हिने जिद्दीने अभ्यास करीत बारावीत घवाघवीत यश संपादन केले.तिला भविष्यात वैध्यकीय सेवेत जायचे असून ग्रामीण भागातील रुग्णांनाची सेवा करण्याकरिता आपल्या गावातच वडिलांच्या फार्मासिच्या बाजूला आपला दवाखाना उघडण्याचे असल्याचे बोलून दाखविले.
कामाक्षी देशमुख हिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील,भाऊ व तिच्या गुरुजनांना दिले असून तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.प स सदस्य व माजी उपसभापती संजय चिकटे, दिपचंद कांबळे, प्रा आनंद गाणार, प्रशांत रावळे, कमलेश मुण, प्रशांत देवळे आदींनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
आपल्या परिस्थिला,नशिबाला दोष न देता मनात ध्येय साध्य करण्याची जिद्द असेल तर यशाची पायरी गाठतांना कोणतीही अडचण येत नाही.