-दिनेश दमाहे ,मुख्य संपादक
नागपुर – फिर्यादी नामे गणेश सेवकराम मेश्राम, वय 30 वर्ष रा. प्लॉट नं. 03, नवकन्या नगर, महालक्ष्मी किराणा दुकानाचे जवळ, आर.बी. ले आऊट भरतवाडा रोड, पो.स्टे.कळमना, नागपुर यांनी पो.स्टे. कळमना येथे तक्रार दिला होता की, त्यांनी आपली टु व्हिलर पॅशन एक्स प्रो गाडी क्र. एम.एच. 49 ए.एम. 9324 ही दि. 10/01/2022 रोजीचे 11ः30 वा. सुमारास आपले राहते घराचे समोर लॉक करून उभी ठेवली होती. ते सकाळी 06ः30 वा. सुमारास झोपेतुन उठले असता त्यांना त्यांची नमुद गाडी ठेवलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. नमुद गाडी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पो.स्टे. कळमना, नागपुर शहर येथे दि11/01/2022 रोजी अप.क्र. 23/2022 कलम 379 भा.दं.वी. प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दि. 14/01/2022 रोजी रात्रपाळी डयुटीवर पो.स्टे. हद्दीत पोलीस स्टाफ सह खाजगी वाहनाने भरतवाडा बिट परिसरामध्ये सराईत गुन्हेगार चेकींग करीत असतांना 00ः30 वा. सुमारास पो.स्टे. हद्दीतील गुन्हेगार नामे हरीपाल हिंसाराम बनोठिया, वय 28 वर्ष, रा. प्लॉट नं 127 दुर्गा नगर भरतवाडा रोड कळमना, पो.स्टे. कळमना, नागपुर हा एका पॅशन प्रो गाडीवर भरतवाडा रोड, किर्ती रेस्टॉरंटकडे जातांना दिसला त्याचा पाठलाग करून त्यास थोडया दुरवर रोडच्या बाजुला थांबविले. नमुद इसमाकडे असलेली पॅशन एक्स प्रो गाडी क्र. एम.एच. 49 ए.एम9324 या गाडीबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिलीवरून नमुद गाडी व त्यास वेळीच ताब्यात घेवुन पो.स्टे. आणुन सदर गाडीबाबत पो.स्टे. अभिलेख पडताळुन पाहिला असता नमुद गाडी ही पो.स्टे. दाखल अप.क्र. 23/2022 कलम 379 भा.दं.वि. मध्ये चोरीची असल्याचे दिसुन आले. वरून नमुद पॅशन एक्स प्रो गाडी क्र. एम.एच. 49 ए.एम. 9324 कि.अं. रू. 20,000/- ही पंचासमक्ष जप्त केलीनमुद आरोपी इसमाकडे गुन्हयाचा सखोल तपास केला असता त्याने कळमना मार्केट परिसरामध्ये विविध ठिकाणावरून विविध कंपनीचे मोबाईल चोरी केले असल्याचे कबुली दिली .
पंचासमक्ष दिलेल्याकबुली निवेदनाप्रमाणे त्याचेकडे केलेल्या मेमाेरंडम पंचनामा प्रमाणे:-
1) Redmi कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल फोन एकुण 03 नग एकुण किं.अं. रू.22,000/-
2) Vivo कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल फोन एकुण 03 नग एकुण किं.अं. रू.22,000/-
3) Oppo कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल फोन एकुण 02 नग एकुण किं.अं. रू. 16,000/-.
4) Samsung कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल फोन एकुण 03 नग एकुण किं.अं. रू.30,000/-.
5) Apple कंपनीचा iPhone मोबाईल फोन एकुण 01 नग एकुण किं.अं. रू.5,000/-
असा दोन्ही मिळुन रू.1,15,000/- चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र.05 मनिश कलवानिया, सहा. पोलीस आयुक्त(कामठी विभाग) नयन आलुरकर यांचे मार्गदर्शनात पोस्टे. कळमना चे वरिष्ट पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सपोनि राहुल डोंगरे, स.फौ. अजय गर्जे, पो.हवा. दिपक धानोरकर, ना.पो.शि. प्रविण लांडे, ना.पो.शि अभय साखरे, ना.पोशि. अशोक तायडे, पो.शि. सचिन दुबे , अनिल जाधव यांनी केली