संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 24:- ‘कलम ‘सामाजिक संस्थेचे सांस्कृतिक , सामाजिक, स्पर्धा परीक्षा ,महिला जनजागृती अभियान विविध क्षेत्रात फार मोलाचे योगदान असल्याचे मत माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कलम सामाजिक संस्थेच्या वतीने गंज के बालाजी मंदिर सभागृहात आयोजित होळी मिलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले .
होळी मिलन कार्यक्रमाची सुरुवात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी आमदार टेकचंद सावरकर, उमरेड चे माजी आमदार सुधीर पारवे, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता अनिल निधान ,माजी जी प अध्यक्ष निशाताई सावरकर,पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे ,डॉ राजेंद्र अग्रवाल, शहर भाजपाध्यक्ष व नगरसेवक संजय कनोजिया,अजय कदम, डॉ संदीप कश्यप ,श्रीकांत शेंद्रे, पंकज वर्मा, विजय कोंडुलवार, सुषमा सीलांम, संध्या रायबोले ,पिंकी वैद्य, राजेश देशमुख, लालसिंग यादव ,रामसिंग यादव ,मंगेश यादव,संतोष मिश्रा,रमेश वैद्य, मनोज गोटे,चंद्रशेखर तुप्पट,प्रा मनीष बाजपेयी , सुनील खानवाणी, उजवल रायबोले, सुनील पाटील ,सुनील शीलाम, राजेश खानवानी , गोपाल सीरिया,दिनेश शरण, अश्फाक भाई, राजा यादव, हर्षद अढाऊ, उपस्थित होते कार्यक्रम मिलन कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक रोहित म मिश्रा यांच्या भजन संध्या कार्यक्रम व कवी संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी काव्यरचना व भजन सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली .याप्रसंगी गायक राकेश जैन यांनी साई ने बुलाया है, जो राम के को लाये है..असे सुंदर भजन सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कलम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्कृती, सामाजिक, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा ,महिलांसाठी जनजागृती अभियान विविध प्रकारच्या कार्यक्रम आयोजन करून समाजाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य करीत आहे होळी मिलन कार्यक्रमाचे उत्तर आयोजन केल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मनिष वाजपेयी यांनी केलेले संचालन एडवोकेट भूषण तिजारे यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी मांनले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.