वाडी :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धरमपेठ महाविद्यालयाच्या पटांगणावर घेण्यात आलेल्या कबड्डी सामन्यात १९ वर्षे वयोगटात वाडीतील जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुला-मुलींनी विजय प्राप्त केला आहे.या यशाबद्दल संस्थेचे सचिव युवराज चालखोर, तालुका क्रीडा समन्वयक व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक उमेश चौरे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा कबड्डी संघ विजयी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com