संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22: नागपुर परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी पोलिसांनी शुक्रवारी बाजार कामठी शहरातील तब्बल 14 नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल फोन परत मिळवून दिले आहेत. हे 14 मिसिंग झालेले मोबईल तक्रारदारांना जुनी कामठी पोलिसानी परत केले. हे हरविलेले 14 मोबाईल्स तब्बल 1 लक्ष 40 हजार रुपये किमतीचे होते.. मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. आपले हरवलेले मौल्यवान मोबाईल फोन परत मिळाल्याने पोलिस व कायदेयंत्रणा यांविषयी नागरिकांच्या मनात असलेली विश्वासार्हता वाढली आहे.याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या शुभ हस्ते हरविलेल्या मोबाईल मालकांना मोबाईल परत करून दिल्याने तक्रादारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण निर्माण केले.
ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, एसीपी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे,तपास पथकातील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने,पोलीस हवालदार रवींद्र गावंडे, विवेक दोरसेटवार,अश्विन चहांदे,सायबर सेलचे कर्मचारी उपेंद्र आकोटकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.