गोंदिया – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत संचालित निरंतर शिक्षण व विस्तार केंन्द्राद्वारा मान्यता प्राप्त एन.एम.डी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग द्वारे पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शारदा महाजन यांनी कार्यक्रमात दिली. सदर अभ्यासक्रम महाविद्यालयात शिक्षण घेणारे विविध विभागातिल विद्यार्थ्यांसाठी संस्था सचिव माजी आमदार राजेंद्र जैन, युवा संचालक निखिल जैन,प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर विषयाचे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे याकरीता तसेच येणाऱ्या नविन शैक्षणिक धोरण लक्षात घेवून पत्रकारीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला . दि.१९ आँक्टोबर ला महाविद्यालयाचे सभागृहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली वरीष्ठ प्राध्यापक डॉ.राकेश खंडेलवाल,प्रा.डॉ. अर्चना जैन, अभ्यासक्रम संचालक प्रा.डॉ. बबन मेश्राम, प्रा.डॉ. संजय जगने,प्रा.घनश्याम गेडेकर,प्रा.रीतेश चौलीवार यांच्या उपस्थित करण्यात आले होते.
पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची (सर्टिफिकेट इन जर्नलिझम)
किमान बारावी उत्तीर्ण एन.एम.डी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. दर शनिवार व रविवारी एन.एम.डी कॉलेजात पत्रकारितेचे धडे दिले जातील. विद्यापीठ मान्यता असून शासनमान्य अभ्यासक्रम असल्याने सरकारी तसेच खासगी नोकरीसाठी अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाते. पुढिल सत्रात. ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’सह इतर व्यवसायीक अभ्यासक्रमही कॉलेजात सुरू करण्यात येणार असल्याचे अभ्यासक्रम समन्वयक डॉ. बबन मेश्राम यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.घनश्याम गेडेकर यांनी तर आभार प्रा.रीतेश चौरीवार यांनी मानले.