गुरुदेव सेवा आश्रमातर्फे आदर्श ग्राम पुरस्काराने जयश्री इंगोले सन्मानित

कामठी :- कामठी तालुक्यातील खसाळा ग्रामपंचायत सरपंच जयश्री धनजंय इंगोले यांना आदर्श ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महंत नाना महाराज (परसवाडा) यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरविंद रोही यांच्या शुभहस्ते बहाल करण्यात आला.

सरपंच जयश्री इंगोले यांनी सुंदर गाव, स्वच्छ गाव, हि संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. असे गौरवउद्धगार निवृत्त न्यायमूर्ती अरविंद रोही यांनी याप्रसंगी काढले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ॲड. अशोक यावले, आमदार अभिजीत वंजारी, आमदार विकास ठाकरे, गुरुदेव सेवा मंडळाचे रुपराव वाघ, सियाराम चावके, भैय्यालाल माकडे, धनंजय इंगोले, प्रा.पाशा पटेल, डॉ. उध्दव साबळे, संजय टेकाडे आणि दीपक पुनसे यावेळी उपस्थित होते. सरपंच जयश्री इंगोले यांना आदर्श ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर विविध स्तरांवरून व मान्यवरांच्या तर्फे अभीनंदनाचा वर्षाव होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमरनगरात नेत्र तपासणी व निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद

Mon May 13 , 2024
नागपूर :- दक्षिण नागपूर येथील अमरनगर हनुमान मंदिर समाजभवन येथील निःशुल्क नेत्र तपासणी व दंत मुख रोख निदान शिबिर रविवारी 12 मे रोजी, शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महात्मे नेत्र पेढी व नेत्र रुग्णालय आणि डॉ. प्रेमस मल्टीस्पेशलिटी डेंटल क्लिनिक नागपूर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 300 रुग्णांनी लाभ घेतला. डोळे तपासणी 200 रुग्ण, त्यामध्ये 24 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com