जलतरणात विक्रम करणाऱ्या जयंत दुबळे यांचा विभागीय आयुक्तांकडुन गौरव

नागपूर :- सागरी जलतरण मोहिमेमध्ये अत्यंत कठिण मानली जाणारी इंग्लिश खाडी टू वे पोहून आशियाई साहसी जलतरणात विक्रम केल्याबद्दल विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी जयंत दुबळे याचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला. आंतरराष्ट्रिय सागरी जलतरणामध्ये केलेल्या साहसी उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.

इंग्लडची जलप्रसिध्दी असलेली इंग्लिश खाडी इंग्लड ते फ्रास व फ्रास ते इंगलड असे टू वे 70 किलोमीटरचे अंतर 31 तास 29 मिनिटांमध्ये जयंत दुबळे व त्यांच्या टिमने पाहून पुर्ण केले. हा विक्रम दिनांक 18 व 19 जुलै 2023 रोजी केला आहे. या उपक्रमांमुळे नागपुरचे नाव आंतरराष्ट्रिय सागरी जलतरणामध्ये अंकित झाले आहे. यावेळी विभागीय क्रिडा उपसंचालक शेखर पाटिल, सेवानिवृत्त क्रिडा सहसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे उपस्थित होते.

जलतरणाच्या क्षेत्रात नावलौकिक मिळविल्याबद्दल विशेष शुभेच्छा देतांना विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी म्हणाल्या की, नागपूर मधुन सागरी जलतरणपटू तयार व्हावेत तसेच इतर प्रकारातही येथील युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रिडा विभागातर्फे जलतरणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करावे अशा सुचना यावेळी दिल्यात.

इंग्लिश खाडी पार करणे अनेकांना शक्य होत नाही, परंतु जयंत दुबळे यांनी ते शक्य करुन दाखविले. ही खाडी पोहण्याचा आनंद होत असून नागपूर येथुनही सागरी जलतरणपटु तयार व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जयंत दुबळे यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एसजीएलटी-2 पर सतत चिकित्सा शिक्षा कार्यक्रम आयोजित

Mon Jul 31 , 2023
नागपुर :- डायबिटिक एसोसिएशन ऑफ इंडिया नागपुर ने एसजीएलटी-2 पर सीएमई आयोजित की डायबिटिक एसोसिएशन ऑफ इंडिया नागपुर चैप्टर ने कल होटल तुली इंपीरियल, रामदासपेठ, नागपुर में एसजीएलटी-2 पर सतत चिकित्सा शिक्षा कार्यक्रम का आयोजन किया। इसकी अध्यक्षता डॉ रवि वाघमारे ने की। एम्पाग्लिफ़्लोज़िन एक दवा है जिसका उपयोग टाइप 2 मधुमेह मेलेटस के प्रबंधन और उपचार में किया जाता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com