नागपूर :- नागरिकांच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिका व ओसीडब्ल्यू यांच्या वतीने गणेशपेठ भागात जलकुंभ उभारण्यात येत आहे. या जलकुंभामुळे परिसरातील नागरिकांना २४ बाय ७ पाणीपुरवठा मिळणार आहे, काही लोक जलकुंभावरून चुकीची माहिती देत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याची माहिती माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांनी दिली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेच्या अमृत योजनेंतर्गत ओसीडब्ल्यूद्वारे गणेशपेठ भागात जलकुंभ उभारण्यात येत आहे. जलकुंभामुळे जवळपासच्या परिसरात उत्तम पाणीपुरवठा केल्या जाणार आहे. तरी काही लोक जलकुंभ आणि परिसरात सुरु असणाऱ्या विकासकामांबद्दल चुकीची माहिती देऊन सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्न करीत आहेत. असे माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांनी सांगितले. या जलकुंभामुळे महाल, गणेशपेठ, शनिवारी सह इतर परिसरातील नागरिकांना २७ बाय ७ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. असे असताना काही लोक नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्यामनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी नागरिकांनी अशा लोकांवर विश्वास न ठेवता विकासकामात सहकार्य करावे असे आवाहन प्रमोद चिखले यांनी केले. याप्रसंगी माजी नगरसेवक व परिसरातील नागरिक प्रमुख्यने उपस्थित होते.