मुंबई :- समस्त जैन संघांच्या वतीने पर्युषण महापर्वानिमित्त मलबार हिल येथील श्री चंदनबाला जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या सामूहिक रथयात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मध्वजा दाखवून रवाना केले.
यावेळी राज्याचे पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित गच्छाधिपती श्रीमद विजय पुण्यपालसुरीश्वरजी महाराज व इतर जैन साधूंना वंदन केले व सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयोजक संस्था शेठ भेरुलालजी कन्हैयालालजी कोठारी धार्मिक न्यासाच्या विश्वस्त प्रेमालाताबेन कोठारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.