महायुतीचा पहिला संयुक्त मेळाव्यात जयदीप कवाडे, चित्रा वाघ करणार मार्गदर्शन

– 14 पक्षाच्या एकजुटीला मिळणार बळ

मुंबई/नागपुर :-आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता महायुती सरकारकडून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात 14 जानेवारीला महामेळावे घेतले जाणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मार्गदर्शन करण्याकरिता महायुतीतर्फे नेत्यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी भाजप, शिवसेना, अजित पवार गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शिवसंग्राम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि अन्य सर्व मित्रपक्षांना सोबत घेत रविवारी 14 जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महायुतीतर्फे रविवारच्या महा मेळाव्यात भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी यांनी दिली.

या मेळाव्यात जिल्ह्यातील माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रविण दटके, मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपील लिंगायत, माजी महापौर संदीप जोशी, प्रा. संजय भेंडे, भाजपा शहर अध्यक्ष बंटी कुकडे कुकडे, संदीप गवई, माजी आमदार मिलिंद माने, विलास त्रिवेदी, चंदन गोस्वामी, आदर्श पटले, शिवसेनेतर्फे संपर्क प्रमुख व समन्वयक मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख संदीप इकटेलवार, सुरज गोजे, दिवाकर पाटणे, विनोद सातंगे, समीर शिंदे, जयंत कोकाटे, अमोल गुजर, शुभम नवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष कैलाश बांबोले, राष्ट्रवादी कॅाग्रेसतर्फे शहर अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर, इश्वर बाळबुधे, श्रीकांत शिवणकर, सतीश शिंदे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे संदीप कांबळे, रिपाई (आठवले) तर्फे विनोद थुल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी कामाचे व्यवस्थापन करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजना, देशातील महायुती सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधणे आणि विविध प्रकल्प आणि विकासकामांची माहिती नागरिकांना देणे अशा प्रकारचे नियोजन मेळाव्यात करण्यात आले आहे. घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाने काम व्हावे, हाही मेळाव्याचा उद्देश आहे, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बसपा प्रदेशाध्यक्ष एड गोणारे यांचे भव्य स्वागत

Sun Jan 14 , 2024
– कार्यकर्त्यांना दिशा निर्देश दिले नागपूर :- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या अध्यक्षपदी ऍड परमेश्वर गोणारे ह्यांची निवड झाल्यानंतर आज त्यांच्या नागपूरातील प्रथम आगमना प्रसंगी बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे रवी भवन येथे भव्य स्वागत केले. या प्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशचे सचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, इंजि दादाराव उईके, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com