बसपातर्फे जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- जयभीम नाऱ्याचे जनक ,बाबासाहेबांचे सहकारी, वऱ्हाड मध्य प्रांतातील बाबासाहेबांच्या पक्षाचे आमदार, गोलमेज परिषदेत बाबासाहेबांच्या बाजूने तारा पाठवणारे तसेच पुणे करारावर बाबासाहेबां सोबतच सही करणारे कामठी निवासी बाबू हरदास एल एन यांची आज कामठी विधानसभा बसपाच्या वतीने 119 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंती समारोहाला महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, कामठी विधानसभा अध्यक्ष इंजि.विक्रांत मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करून मुख्य मार्गाने ढोल ताशांच्या निनादात जनसंपर्क अभियान अंतर्गत अभिवादन रॅली काढण्यात आली.

ही रॅली “जयभीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने मे, जयभीम चे जनक बाबू हरदास अमर रहे, महापुरुषोके सन्मान में बीएसपी मैदान मे, संविधान के सन्मान में बीएसपी मैदान मे, जयभीम-जय संविधान” आदि गगनभेदी घोषणा देत-देत बाबू हरदास एल एन यांच्या पुतळ्यापर्यंत गेल्यावर बाबू हरदास एल एन यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर जयस्तंभ चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सभेत रूपांतर झाले. या कार्यक्रमात पृथ्वीराज शेंडे, उत्तम शेवडे, किशोर गेडाम, राहुल सोनटक्के, संदीप मेश्राम यांनी बाबू हरदास यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामठी विधानसभेचे अध्यक्ष इंजिनिअर विक्रांत मेश्राम यांनी तर समारोप नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी केला.

कार्यक्रमाला नागपुरातून जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, माजी नगरसेवक देवेंद्र वाघमारे, योगेश लांजेवार, उत्तर नागपूरचे विधानसभा अध्यक्ष जगदीश गजभिये, पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष सनी मून, दक्षिण पश्चिम चे अध्यक्ष ओपुल तामगडगे, युवा नेते सदानंद जामगडे, चंद्रशेखर कांबळे, अभिलेष वाहाने, विद्यार्थी नेते आशिष फुलझेले, तपेश पाटील, बुद्धम राऊत, सचिन मानवटकर, राजेंद्र सुखदेवे, मॅक्स बोधी, विवेक सांगोडे, राजकुमार तांडेकर,

कामठी नगरपरिषदचे माजी सभापती रमाताई नागसेन गजभिये, विनय ऊके ,सुधाताई रंगारी, दिपाली गजभिये ,निशिकांत टेंभेकर, नागसेन गजभिये, प्रशांत गजभिये, संपदिप मेश्राम ,धम्मा चव्हाण गुरुपाल बोरकर, रवी मधुमटके, अनिल कुरील, चंद्रशेखर पाटील , विशाल गजभिये,अमित भैसारे, विकास रंगारी, गितेश सुखदेवे, अभय नितनवरे, रामभाऊ कुर्वे, परमानंद बनसोड, आयुष पाटील, राजन बागडे, गौतम काचेकर, शशिकला तिरपुडे, संजदीप मेश्राम, विशाखा रामटेके, अश्विनी तिरपुडे, नलू रंगारी, सुशीला खांडेकर, चंद्रकला चव्हाण, कांता गजभिये, ललिता मेश्राम, हर्ष चव्हाण यांचे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 9 ग्रामपंचायत उपसरपंचाची निवडणूक शांततेत

Sat Jan 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- 18 डिसेंबरला पार पडलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या थेट जनतेतून 27 सरपंच तसेच 93 प्रभागातून 247 सदस्यांची निवड करण्यात आली.यातील उपसरपंच पदाची निवडणूक ही तीन टप्प्यात होऊ घातली आहे त्यानुसार आज 6 जानेवारीला 9 ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची निवडणूक पीठासीन अधिकारी नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक अधिकारी यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. उपसरपंच पदाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!