जयभीम चौकात रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 10:- परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून जयभीम चौक कामठी येथील प्रज्ञा शील करुणा बुद्ध विहार येथे रक्तदान शिबिर, मोफत रोगनिदान तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून शेकडो च्या वर भीम अनुयायांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
या रक्तदान शिबिर, मोफत रोगनिदान शिबिर तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर कार्यक्रमाचे उदघाटन भन्ते नागदिपणकर यांच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेऊन करण्यात आले.या शिबिराला आयुष्यमान हॉस्पिटल च्या वैद्यकीय चमूने विशेष आरोग्य सेवा पुरविली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक प्रज्ञा शिल करुणा बुद्ध विहार, प्रशिक अखाडा मंडळ, जयभीम युवा मंचच्या भीम अनुयायांनी मोलाची भूमीका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तारा माता मंदिरात मनोकामना घट व महाप्रसादाणे चैत्र नवरात्राची सांगता

Sun Apr 10 , 2022
संदीप कांबळे ,कामठी कामठी ता प्र 10 –  तालुक्यातील न्यू येरखेडा येथील सार्वजनिक तारा माता मंदिरात मनोकामना घट व महाप्रसादाने चैत्र नवरात्राची सांगता करण्यात आली हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला कारमोरे यांचे हस्ते तारा माता मंदिरात पूजा-आरती करून मनोकामना गट विसर्जनाला सुरुवात करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आले महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला महाप्रसाद कार्यक्रमाला मंदिर पंच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com