काटोल :-दिनांक 6 जानेवारी 2023 रोज शुक्रवारला नबिरा कनिष्ठ महाविद्यालय काटोल.येथे डॉ.राजूजी देशमुख अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ काटोल यांच्या वाढदिवसाचे निमित्य साधून तसेच शिक्षण प्रसारक संचालक मंडळातील निरंजन राऊत,प्रकाश चांडक,पुरुषोत्तम मानकर, योगेश पांडे यांच्या प्रेरणेने व प्राचार्य एस.के.नवीन व उपप्राचार्य एस.एम.राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून DYSP पोलीस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले ‘यश जर मिळवायचे असेल तर सतत प्रयत्न करत रहा. यश तुमचेच आहे.’ तसेच ते म्हणाले विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा तसेच कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून लाभलेले गटशिक्षण अधिकारी संतोष सोनटक्के यांनी ‘जय जवान जय किसान जय विज्ञान’ असा बहुमोल संदेश दिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य खोरगडे ही उपस्थित होते त्यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले.
डॉ.एन.बी.हिरुडकर, डॉ. रीना मेश्राम ,प्रा.डी. एम.रिधोरकर व प्रा.प्रवीण लोही यांनी विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षण केले.
विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रणय सहारे व जान्हवी राऊत वर्ग 11 वी विज्ञान (ब) यांना प्रथम पारितोषिक लवकेश बेलसरे व प्रीतम भूजाडकर वर्ग 11 वी विज्ञान (अ) यांना द्वितीय क्रमांक व पलक वाघमारे वर्ग 11 वी विज्ञान (अ) हिला तृतीय व मुकुल कलंबे, स्वप्नील कोहळे वर्ग 11 वी विज्ञान (अ) यांना व निकिता बाविस्कर वर्ग 11 वी विज्ञान (ब) यांना प्रोत्साहितपर बक्षीसे देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी.एच.भुयार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.एन. राऊत व प्रा.एस.एन.काकपुरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.एस.एच. सिरसाम यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनातील प्रतिकृती तयार करण्याकरिता प्रा.टी.आर. मुंदाने, प्रा.एम.आर. भोसे, प्रा. एन. के. पाठे, प्रा.पी.पी भक्ते, प्रा.एल.पी. मानकर , प्रा.एच.आर. तीखे, प्रा.जे.पी शिरस्कर, प्रा.आर.पी. बन्सोड, प्रा. एस.एस.तायडे , प्रा.बी.पी देशमुख, प्रा.एम.एस.बोलवर, प्रा.ए.एन.सोनवणे , प्रा.ए.आर.वीर , प्रा.जी टी. निमजे, प्रा.आर.बी.डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.