श्रद्धास्थानात गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात संपन्न
नागपुर – रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही परमपूजनीय समर्थ सद्गगुरु श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रगटदिन भाविकवृंदाद्वारे उत्साहात संपन्न झाला. सकाळी 8.30 वाजता श्रींच्या रथयात्रेचा नामस्मरण पालखीचा शुभारंभ भाजपा शहर अध्यक्ष आमदार श्री प्रवीणजी दटके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नरकेसरी प्रकाशन चे अध्यक्ष डॉ विलासजी डांगरे, ऍड रमण सेनाड, नगरसेविका सौ दिव्याताई धुरडे, गजानन महाराज श्रद्धास्थानाचे संयोजक श्री गिरीशदादा वराडपांडे , डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ गिरीश चरडे, आदी भाविक वृंद उपस्थित होते. महिला भाविकांनी श्रींच्या रथयात्रेच्या मार्गात सडे शिंपडून, रांगोळ्यांनी सुशोभीत करून श्रींच्या रथावर पुष्पावृष्टीचा वर्षाव करण्यात आला, भाविकांनी श्रींच्या मुळ प्रतिमेला औक्षवाण व पुजन केले .या पालखीत श्री गजानन जय गजानन , गण गण गणांत बोते , ओम गजानन नमो नम , गुरु गजानन माझे आई मजला ठाव द्यावा पायी , आदी मंत्रांच्या गजराने रेशीमबागेतील वातावरण शेगावमय झाले, सकाळी 11 वाजता श्रींना लघुरुद्राभिषेक करून मंगल आरती व प्रसाद वितरण करण्यात आले. या पालखीसाठी नरेंद्र गोरले , प्रकाश निमजे, बाळ भेंडे , सुभाष मानकर, दीपक वाळके, डॉ मुकुंद पांडे, सतीशराव निफाडकर,संजय रक्षिये,नरेश ईटनकर, रमाकांत पेंडके , अरविंद पिट्टलवार, मोहन रसेकर, श्री गाकरे,मातृशक्ती मंडळाच्या सीमा पेंडके , दीपाली निमजे, लताताई तेलंग, मंगला पोटे,भारती वाळके, ममता मानकर,चित्रा मानकर, आशु पोहणे,सायली सांगोले, गीता मौदेकर, समृद्धी वराडपांडे ,वैजयंती अटाळकर, प्रांजली देव, गौरी रक्षिये, आदी भाविकावृंदानी सहकार्य केले. उद्या गुरुवार ला सकाळी गजानन विजय ग्रंथाच्या 21 व्या अध्यायचे सामूहिक पठण व संध्याकाळी श्रींची पंच परिक्रमा होईल.