नागरीक जे जे मागतील ते ते त्यांना देईल – आमदार जयस्वाल

– आदिवासी गौरव दिन कार्यक्रम वेळी आमदार जयस्वाल यांचे उद्गार

– शबरी आवास योजनेंतर्गत रामटेक विधानसभा क्षेत्रातील आदिवासींना १० हजार घरकुल मंजुर

– कुवारा भिवसेन येथे साकारणार गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र

रामटेक :- दिनांक 7 ऑगस्ट ला शहरातील गंगाभवनम सभागृहामध्ये आदिवासी गौरव दिनाच्या औचीत्याने भव्य अशा कार्यक्रम पार पडला यात आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना दहा हजार घरकुलांची तथा गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र ची भेट दिली. तेव्हा या दरम्यानच आमदार जैसवाल यांनी माझ्या मतदारसंघातील नागरिक जे जे मागतील तेथे मी त्यांना देईल असे उद्गार काढत संबोधन केले.

दुपारी १ च्या सुमारास दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर गोंडी नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यानंतर मंचावरील मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला. रामटेक विधानसभा क्षेत्रातील अनेक नागरिक व विशेषतः आदिवासी नागरिक घरकुला पासून वंचित होते मागणी मोठी व शासनाकडून त्याची पूर्तता फार कमी प्रमाणात करण्यात येत होती तेव्हा नागरिकांनी आमदार जयस्वाल यांच्यापुढे सदर समस्या ठेवली ही समस्या हेरून आमदार जयस्वाल यांनी शासन दरबारी वरच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले व शबरी योजनेअंतर्गत तब्बल दहा हजार घरकुले मंजूर झाली पैकी पाच हजार घरकुल आता व उर्वरित पाच हजार घरकुले येत्या काही दिवसात मिळणार आहे. आज या कार्यक्रम प्रसंगी आमदार जयस्वाल यांनी लॅपटॉप मध्ये बटन दाबून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वळता करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. तसेच कुवारा भिवसेन येथे तब्बल १७ एकर जागेत गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र साकारणार असल्याची माहिती कार्यक्रमादरम्यान आमदार जयस्वाल यांनी सांगीतले. यावेळी उपस्थितांमध्ये आमदार आशिष जयस्वाल, एस.डी.ओ. वंदना सवरंगपते, जि.प. सदस्य संजय झाडे, सतीश डोंगरे, पं.स.सभापती संजय नेवारे, बिडीओ जयसिंग जाधव, माजी जि.प. सदस्य नरेश धोपटे, शोभा झाडे, पंचायत समीती पदाधिकारी – अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक वर्ग, सरपंच गणेश चौधरी, सरपंच उर्मिला खुडसाव, सरपंच उमेश भांडारकर, माजी सरपंच आशिष मासुरकर, तालुक्यातील सरपंच मंडळी तथा आदिवासी बांधव तथा नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

आमदार साहेबांचे आभार – जि.प. सदस्य डोंगरे

कार्यक्रमात उपस्थीत असलेले मनसर – शितलवाडी सर्कल चे जि.प. सदस्य सतीश डोंगरे म्हणाले की आदिवासीबहुल भागाची सुरुवात माझ्या सर्कल पासुन होते तेव्हा विशेषतः आमदार जयस्वाल यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुले आणत दिलेले शब्द पाळले तेव्हा त्यांचे मी आभार व्यक्त करतो.

साहेबांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले – जि.प. सदस्य झाडे

आमदार एक वकील असल्याकारणाने तसेच आमदारकीचा दांडगा अनुभव असल्यामुळे साहेबांना कोणते काम कसे खेचून आणावे हे बऱ्यापैकी माहित आहे त्यामुळे नागरिकांच्या तथा विविध पदाधिकाऱ्यांच्या वार्ता साहेबांच्या कानावर गेल्या असता त्यांनी लगेच घरकुलांविषयी वरच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुल खेचून आणली ही मोठी बाब असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले.

शक्य होईल तेवढे मी जनसामान्यांसाठी करेल – आमदार आशिष जयस्वाल

नागरिकांच्या घरकुल अंतर्गत घर बांधकामात कोणतीही अडचण तथा समस्या येऊ नये याबाबत लक्ष देण्याचे निर्देश उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना आमदार जयस्वाल यांनी दिले तथा शक्य होईल तेवढे मी जनसामान्यांसाठी करेल असे सांगत घरकुल साठी रॉयल्टी मोफत, घर बांधत असतांना लागणाऱ्या रेतीची वाहने कुणीही थांबवणार नाही, असंघटीत बांधकाम मजुरांना अतिरिक्त दिड लाख मिळेल फक्त त्यांनी नोंदणी करावी, सोलर सिस्टीम साठी प्रयत्न सुरु असुन नागरीकांचा विज बिल बोजा कमी करण्याच्या प्रयत्नात मी असल्याचे जयस्वाल यांनी सांगीतले. २ सप्टेंबर ला देवलापार येथे उपमुख्यमंत्री फडणविस येत असुन तेथे नागरीकांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहण जयस्वाल यांनी केले. जनसामान्यांना अभिमान वाटेल असे कुवारा भिवसेन येथे गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय १७ एकर जागेत साकारणार असल्याचे सांगीतले. आदिवासींचा इतिहास त्यातुन दाखवायचा आहे असे ते बोलतांना म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनसहभागाने ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम यशस्वी करू, शहरातील स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत मनपा आयुक्तांचा निर्धार

Tue Aug 8 , 2023
नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करू, असा निर्धार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाच्या अनुषंगाने सोमवारी (ता.७) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्वयंसेवी संस्थांची बैठक घेण्यात आली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!