भंडारा : संसार असो की समाजकारण निर्णयक्षमतेत महीलांनी सहभागी होणे गरजेचे आहे.मात्र महिलांनी आर्थिक स्वावंलबनासोबत राजकारणातही गुणवत्ता सिध्द करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे जिल्हयातील सरपंच व बचतगटांच्या कौतुक सोहळयाला अतिरीकत जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर ,महिला बालविकास अधिकारी मनिषा कुरसंगे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अर्चना कडू,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे,सहायक नियोजन अधिकारी वैशाली मळेकर, पांडे,सहायक नियोजन अधिकारी मानव विकास वर्षा गुरव, माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
इतनी शक्ती हमे देना देता या प्रार्थनेने यावेळी कार्यक्रमाला सुरवात झाली.ग्रामीण भागातुन नेतृत्वगुण सिध्द करून सरपंच महिलांचा सत्कार यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केला.सितेपार सरपंच मंजुषा झंझाड, पुष्पा कांबळे बोरी तुमसार,प्रिती घोरमाडे,जांभळी,संध्या कुळमेथे,दिघोरी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी बचतगटांनी महीलांना आत्मविश्वास दिला.आर्थिक स्वावलंबनाने दिलेल्या आत्मविश्वासानेच आज मी गावाचा कारभार सक्षमपणे करू शकले असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोडे यांनी जिल्हयातील माविमच्या 88 दुग्ध् संकलन केंद्राव्दारे 2 लाख लिटर दुध संकलन करण्यात येत आहे.तसा महीला बचतगटांनी शेतकरी उत्पादक कंपन्यादेखील स्थापन केल्या आहेत.माविमने जिल्हयात कोरोनाकाळात अत्यंत निष्ठेने काम केले.यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक अर्चना कडू यांनी शेतकरी उत्पादक कंपनीव्दारे महिलांनी आर्थिकरित्या आत्मनिर्भर व्हावे,.कृषी विभाग त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
उपस्थित महिला अधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. माविमच्या सात तालुक्यातील सहयोगीनी, लोकसंचालीत साधन केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते.