चिमुकल्यांच्या विक्रमी उपक्रमाला उपस्थिती माझे सौभाग्य – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे  

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

चिमुकल्यांच्या कृतीमुळे भारावले अधिकारी. 

धर्मराज प्राथमिक शाळे तर्फे विक्रमी दीपोत्सव- रंगोत्सव साजरा. 

कन्हान :- चिमुकल्यांनी अवघ्या तीन तासात सात हजार दिवे रंगविण्याचा अनोखा उपक्रम धर्मराज प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी आज (दि.१९) ला करून दाखविला. सर्वत्र उत्साहाचा झगमगाट करणा-या दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येकामध्ये पेरण्याच्या उद्देशाने धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

धर्मराज शाळेच्या प्रांगणात सकाळी सव्वा सात वाजता ” दिपोत्सव… रंगोत्सव ” या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व राज्यातील पहिल्या भव्य उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, गटशिक्षणाधिकारी वंदना हटवार, शाळेचे संस्थापक सचिव खुशालराव पाहुणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रमेश साखरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  धनंजय कापसीकर, पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी चिमुकल्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

” दिपोत्सव… रंगोत्सव ” कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना  कमलकिशोर फुटाणे यांनी राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणातील या उपक्रमाचे कौतुक करत ” शिका आणि कमवा ” याचे संस्कार धर्मराज शाळेतुन बालवयात मिळत असल्याचे सांगुन शाळा प्रशासनाचे कौतुक केले. या अभिनव उपक्रमाची संकल्पना मांडुन ती प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल उपक्रमशील शाळेचे कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी वंदना हटवार यांनी ही शाळा सातत्याने उपक्रमशील व नियोजनबद्ध काम करणारे मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या संकल्पनेतुन नवनवीन प्रयोग राबवित विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करत असल्याचे सांगितले. या चैतन्यदायी शिक्षणातुनच खरे शिक्षण प्राप्त होते असे सांगत प्रत्येक शिक्षकाने व शाळेने नवनवीन उपक्रम राबवित विद्यार्थ्यां मध्ये चैतन्य निर्माण करावे असे आवाहन केले. संस्थापक सचिव खुशालराव पाहुणे यांनी चैतन्यदायी उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी करून आनंद पेरणा-या या उपक्रमाची संकल्पना भिमराव शिंदे,मेश्राम यांची असल्याची माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र कडवे यांनी करत शाळेचा विकास आराखडा उलगडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमीत मेंघरे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थापक सचिव  खुशालराव पाहुणे, गटशिक्षणाधिकारी वंदना हटवार यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक खिमेश बढिये, भिमराव शिंदे,मेश्राम, राजु भस्मे,  अमित मेंघरे, किशोर जिभकाटे, चित्रलेखा धानफोले, शारदा समरीत, हर्षकला चौधरी, प्रिती सुरजबं सी, अर्पणा बावनकुळे,  पूजा धांडे, वैशाली कोहळे, कांचन बावनकुळे, सुनीता मनगटे,  सुलोचना झाडे, नंदा मंदेवार, संगीता बर्वे यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एन.एम.डी महाविद्यालयात पत्रकारीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम..

Thu Oct 20 , 2022
गोंदिया –  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत संचालित निरंतर शिक्षण व विस्तार केंन्द्राद्वारा मान्यता प्राप्त एन.एम.डी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग द्वारे पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शारदा महाजन यांनी कार्यक्रमात दिली. सदर अभ्यासक्रम महाविद्यालयात शिक्षण घेणारे विविध विभागातिल विद्यार्थ्यांसाठी संस्था सचिव माजी आमदार राजेंद्र जैन, युवा संचालक निखिल जैन,प्राचार्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!