संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेरी गावाजवळील एच पी पेट्रोलपंप समोर कामठी हुन कन्हानकडे दुचाकीने डबलसीट जाणाऱ्या दुचाकीचालकाची चार अज्ञात आरोपीने मोबाईल हिसकावून लुबाडणूक केल्याची घटना काल रात्री साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी नौशाद परवेज अयुब अन्सारी वय 22 वर्षे रा आझाद नगर कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चार आरोपी विरुद्ध भादवी कलम 341, 392,504, 34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित फिर्यादी नौशाद परवेज मो अयुब अन्सारी हे आपल्या मित्राला कन्हान ला सोडण्यासाठी प्लेझर दुचाकी क्र एम एच 40 यु 8728 ने आजनी गादा मार्गे नेरी हुन कन्हान कडे जात असता नेरी गावातील एच पी पेट्रोलपंप जवळ चार अज्ञात इसमानी दुचाकी थांबवून दुचाकी चालकाला शिवीगाळ देत त्याच्या खिशातील 10 हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडल्याची माहिती कळताच एसीपी नयन आलूरकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, पोलिस उपनिरीक्षक किशोर मोतींगे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून आरोपी शोधाला गती दिली असून पुढील तपास सुरू आहे.