– जगन्नाथ बलभद्र सुभद्रा माईंची स्नान यात्रा संपन्न,रघुनाथ स्वामी महाराजांच्या श्रध्दांजलीने कार्यक्रमाला प्रारंभ
नागपुर :- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे संस्थापकाचार्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे प्रिय शिष्य श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांच्या निर्देशानुसार इस्कॉनच्या वतीने 8 जुलै 2024 रोजी जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने श्री श्री राधा गोपीनाथ मंदिराच्या प्रांगणात गेट क्रमांक 2, एम्प्रेस मॉलच्या मागे, गांधी सागर, नागपूर येथे जगन्नाथ बलभद्र व सुभद्रा मैय्यांची स्नान मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनाथ स्वामी महाराजांचे सन्यासी शिष्य रूप रघुनाथ स्वामी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नरहरी ठाकूर प्रभू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. आरती दरम्यान, नित्यानंद चैतन्य प्रभू यांनी “जे अनिलो प्रेम-धन कोरुना प्रसन्न, हेनो प्रभू कोथा गेला आचार्य-ठाकूर” हे अतिशय हृदयस्पर्शी भजन सादर केले.
इटालियन भाषिक रूप रघुनाथ स्वामी महाराज यांचा जन्म अर्जेंटिना येथे झाला होता व त्यांचे वय 82 वर्षे होते. भगवद्गीता, भागवतम् आणि सनातन धर्माचा अनेक देशांत प्रचार करून त्यांनी आपले जीवन सार्थक केले. जगन्नाथजींच्या स्नानयात्रेच्या दिवशी, इस्कॉन भोपाळ येथे स्नान यात्रेवर प्रवचन दिल्यानंतर लगेचच हृदयविकारामुळे ते गौलोक धाममध्ये दाखल झाले.
त्यांच्या प्रतिमेच्या आरतीनंतर विशाल प्रभू यांनी हरे कृष्ण महामंत्र “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे” या कीर्तनाच्या स्वरात भगवान श्री जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा यांचा मंदिर परिसरात प्रवेश झाला.
नागपूर इस्कॉनचे प्रवक्ते डॉ. श्यामसुंदर शर्मा यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, तिन्ही मूर्तींचे अभिषेक प्रथम व्रजेंद्र तनय प्रभू, नरहरी ठाकूर प्रभू आणि श्रीपंढरीनाथ प्रभू यांनी केले व सोबतच स्नान यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर कल्पतरू प्रभू, सुदामा प्रभू, भगीरथ प्रभू इत्यादी अनेक ब्राह्मण भक्तांनी अभिषेक केला व त्यानंतर यजमान आणि पाहुण्यांनी अभिषेक केला. त्यामध्ये विनायक मुदगल व कुटुंबीय, सूर्यवंशी रामदास प्रभू, नरेंद्र बोके प्रभू, प्रकाश मोहाने, विशाल दास, पूर्वा माताजी, रवी कोहळे, संदीप भोयर, ऐश्वर्या सिंह, पुष्पा माताजी, युवराज प्रभू, कोकिळा बॅनर्जी, पल्लवी माताजी, प्रिया माताजी, सरोज माताजी, दिलीप प्रभू, मिलिंद प्रभू परिधी माताजी, अमन पंकज प्रभू इत्यादि चा समावेश होता.
शेवटी इस्कॉन नागपूरचे उपाध्यक्ष व्रजेंद्र तनय प्रभू यांनी सर्व भाविकांना सांगितले की, इस्कॉन तर्फे 8 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रथयात्रा पोद्दारेश्वर राम मंदिरापासून सुरू होऊन दोसर वैश्य भवन चौक, गीतांजली चौक, अग्रसेन चौक, गांधीबाग, स्वामी वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा), खुले चौक, न्यू इतवारी रोड, गांधी पुतळा, बच्छराज व्यास चौक (बडकस चौक), चिटणवीस पार्क, टिळक पुतळा, थाडेश्वर राम मंदिर, आग्याराम देवी चौक मार्गे एम्प्रेस मॉलच्या मागे इस्कॉन मंदिरापर्यंत येईल.
– डॉ. श्यामसुंदर शर्मा
प्रवक्ता, इस्कॉन नागपुर