नागपूर : – स्टार लाईफ पिजंट्स इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या ” मिस टीन इंडिया २०२२ आणि मिस्टर अँड मिस इंटरनॅशनल इंडिया २०२२” या स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. “मिस इंटरनॅशनल इंडिया स्पर्धेत सौंदर्यवती ईशा घुगे हिने आपल्या दोन प्रतिस्पर्थ्यांना मागे टाकून विजेतेपदाचा मुकुट पटकाविला.
रेणुका सांगवान आणि दिशा देसाई या दोघी उपविजेत्या ठरल्या. ईशा घुगे हिने हजरजबाबीपणा दाखवून ज्यूरीने विचारलेल्या प्रश्नाचे चपखल उत्तर दिल्याने जेतेपदाचा मुकुट तिला बहाल करण्यात आला.
ईशा घुगे ही खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांची मुलगी आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ईशाने मिळविलेल्या यशामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.