भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा कॅसिनो खेळतोय? संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे खळबळ

मुंबई :- खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. संजय राऊत यांनी एका कॅसिनोमधील फोटो ट्विट केलाय. या फोटोमधील व्यक्तीने एका रात्रीत 3.50 कोटी रुपये कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात, असा दावा संजय राऊतांनी केलाय. “हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?”, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. त्यांच्या या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोत जुगार खेळणारी व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. त्यानंतर भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलीय.

“आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?”, असा सवाल करत भाजपने संजय राऊतांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर में शीत कालीन अधिवेशन के लिए 500 वाहनों की व्यवस्था, 2 कंपनियों को ठेका 

Mon Nov 20 , 2023
नागपुर :- सिटी में अगले माह 7 से 20 दिसंबर तक होने वाले विधानमंडल के शीत कालीन अधिवेशन के लिए सैकड़ों करोड़ रुपये खर्च किये जाते हैं. यहां आने वाले मंत्रियों, विधायकों, अधिकारियों आदि के लिए वाहनों सहित आवास और भोजन की व्यवस्था की जा रही है. उनके लिए 500 चारपहिया व अन्य वाहनों की व्यवस्था की जाएगी. इस पर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!