भंडारा :- शेतकऱ्यांना धान केंद्रावर धानाचे बोनस करीता सातबारा ऑनलाईन करण्यासाठी मोठया प्रमाणात शेतकरी धानकेंद्रावर जात आहेत. परंतु ऑनलाईन सात बारा नोंदणी करण्याकरीता शेतकरी केंद्रावर जात आहेत यात जिल्हयातील अनेक धानकेंद्र संचालक व त्यांचे कामगार हे १५०० रु ते २००० रु शेतकऱ्याकडून घेत असल्याची तोंडी तसेच व्हिडिओ व्दारे तक्रार प्राप्त झाली असून तो व्हिडीओ समाजमाध्यमा मध्ये देखील वायरल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धान केंद्र संचालक हे लुट करत असल्याचे बघायला येत आहे. शेतकऱ्यांची लुट करण्याऱ्या धान केंद्रावर कार्यवाही करण्यात यावी तसेच कार्यवाहीचा अहवाल तक्रारदारास देण्यात यावे ही कार्यवाहि १० दिवसात झाली नाही तर पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल. आदोलनाची पुर्वसुचना चे निवेदन चे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच छगन भुजबळ अन्न व पुरवठा विभागाचे मंत्री यांना जिल्हाधिकारी च्या मार्फत निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळेस राष्ट्रवादी कॉग्रेस चे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम ,तालुका अध्यक्ष ईश्वर कडंबे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष नितेश मारवाडे,राकेश अहिरकर, नरेश भोयर, अक्षय रोटके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
शेतकऱ्यांची लुट करण्याऱ्या धानकेंद्र चालकांवर चौकशी करुन कार्यवाही करा – अजय मेश्राम
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com