‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले ‘रस्ता सुरक्षा अभियान’ व विविध उपक्रम’ याविषयावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आयुक्त भीमनवार यांची मुलाखत मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. ही मुलाखत निवेदक रिताली तपासे यांनी घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व रस्ते अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता परिवहन विभागामार्फत दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून स्पीड गन, हेल्मेटचा वापर करणे, विभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. तसेच नुकताच सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे, जुन्या गाड्या वापराबाबत करावयाच्या नियमांचे पालन आदी निर्णय आणि शंभर दिवसाच्या कामकाजात प्रामुख्याने करावयाच्या बाबी, याविषयी परिवहन आयुक्त भीमनवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विशेष लेख : आजपर्यंतची मराठी साहित्ये सम्मेलने

Sat Feb 22 , 2025
केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी निर्णय जाहिर करून आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. महाराष्ट्र हे मराठी भाषिकाचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन हे आपल्या मायमराठीचा जागर करण्यासाठी सज्ज झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आणि मराठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!