स्वामी अवधेशानंद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील स्वामी अवधेशानंद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग गुरू ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी व सुजाता कुलकर्णी यांनी योगाचे विविध प्रकार, आसनांचे प्रकार प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून करून घेतले.

यावेळी आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व सांगताना आपला शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक विकास करण्याचे सामर्थ्य योगात असूननेहमी सकाळचा एक तास प्रत्येकाने स्वतःसाठी देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सर्वांनी योग साधना करणे काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी शाळेच्या प्राचार्या डॉ. ईशा मुदलीयार यांनी शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा येथील प्राचार्या डॉ. मंगला राव, सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोयर, प्राचार्या डॉ. ईशा मुदलियार यांसह विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन कविता विघे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संक्षिप्तपुनरिक्षण कार्यक्रमास सुरुवात

Tue Jun 25 , 2024
– 25 जून ते 24 जुलैकालावधीत विशेष मोहीम नागपूर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचीत राहू नये याकरीता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचासंक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (SSR) घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी करुन मोठ्या प्रमाणात नमुना क्र. 6 गोळा करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आले आहे. नागपूर जिल्हयात 1 जानेवारी 2024 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com