संदीप बलविर ,प्रतिनिधी
नागपूर :– जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून दि ०८ मार्च ला ग्रामपंचायत बोथली येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सरपंच कविता नामुर्ते,तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामसंघाच्या अध्यक्ष चित्रा हनवते,सुषमा भोयर आदी उपस्थित होत्या.यावेळी सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.देशात स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खूप उंच भरारी घेतली असली तरी स्त्री पुरुष समानतेच्या नावावर आजही महिलांवर अत्याचारच होत असून तीने शेतात,कार्यालयात आठ तास काम केल्यानंतरही घरी येऊनही ती घरातील सर्व कामे एकटीच करीत असते.जर घरातील पुरुष हा कर्ता आहे व ती जर गृहिणी म्हणून राबली तर ठीक पण ती सुद्धा बाहेर जाऊन कमवून आणत असतांना घरातील सर्व कामे तिने एकटीनेच का म्हणून करायचे?असा उपरोधीक सवाल सरपंच कविता नामुर्ते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.यावेळी ग्रा प सदस्य ममता बारांगे,तुलसी आत्राम,लक्ष्मी नारनवरे,सुषमा देवतळे,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सचिव हुसे साहेब व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.