आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष कर संकलनाच्या अंतरिम (तात्पुरत्या) आकडेवारीनुसार 9 जुलै 2023 पर्यंत स्थिर वाढीची नोंद

नवी दिल्ली :- 9 जुलै 2023 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या अंतरिम आकडेवारीनुसार स्थिर वाढ झाल्याचे दिसून येत आहे.9 जुलै 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराचे एकूण संकलन हे 5.17 लाख कोटी रूपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्‍ये झालेल्या एकूण संकलनापेक्षा यंदाचे करसंकलन 14.65 टक्क्यांनी जास्त आहे.

परताव्याचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन, 4.75 लाख कोटी रूपये आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 15.87 टक्के जास्त आहे. हे संकलन आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकीय अंदाजांच्या 26.05 टक्के आहे.

1 एप्रिल 2023 ते 9 जुलै 2023 या कालावधीमध्‍ये परतावा रक्कम 42,000 कोटी रूपये जारी करण्यात आली आहे.मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत ही रक्कम 2.55 टक्के जास्त आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमचे सरकार मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारण्यासोबतच, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण करण्यास कटिबद्ध : पंतप्रधान

Tue Jul 11 , 2023
नवी दिल्ली :- मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारण्यावर भर देत, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण करण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री परशोत्तम रुपाला यांच्या ट्विटचा प्रतिसाद देत पंतप्रधानांनी ट्विट केले: “अधिक कर्जपुरवठा, उत्तम बाजारपेठ अशा उपाययोजनांतून मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारत, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र विकसित करण्यासाठी आमचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com