महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

– राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन

नवी दिल्ली :- ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदन आज दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली . गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने काॅपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात शनिवारी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त सि्मता शेलार यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, आज सकाळी येथील काॅपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया”, “मंगलमूर्ती मोरया” या घोषणा, ढोल ताशांचा गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३८ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.

गणेशोत्सव काळात कार्यक्रमांची रेलचेल

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणा-या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभागी होतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर जिल्हा पेटवण्याची चिथावणीखोर भाषा करणाऱ्या केदारला अटक करा - ऍड. धर्मपाल मेश्राम

Sun Sep 8 , 2024
– भ्रष्टाचारी सुनील केदारचा दलित विरोधी चेहरा पुढे नागपूर :- हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सातगाव ग्रामपंचायतच्या दलित महिला उपसरपंचाला अभद्र भाषेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सरपंच योगेश सातपुते याच्यावर पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र भर सभेत सरपंच योगेश सातपुते याच्या कृत्याचे समर्थन करून आरोपीच्या केसाला जरी धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू, अशी चिथावणीखोर भाषेत धमकी देणाऱ्या भ्रष्टाचारी सुनील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!