मुंबई :- शिक्षण निरीक्षक, उत्तर मुंबई विभाग यांच्याविरुद्धच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
शिक्षण निरीक्षक उत्तर मुंबई विभाग यांच्या कार्यालयातील कारभाराबद्दल शासन कोणती कार्यवाही करणार अशी लक्षवेधी सदस्य कपिल पाटील यांनी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री देसाई बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले की, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्यामार्फत शिक्षण निरीक्षक, उत्तर मुंबई विभाग यांच्याविरुद्धच्या प्राप्त तक्रारी यांच्या अनुषंगाने 2 ऑगस्ट 2023 च्या आदेशाने शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी केलेल्या अनियमितेच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून शासकीय नियमानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण सरनाईक, भाई जगताप, एकनाथ खडसे, उमा खापरे, अभिजित वंजारी आदींनी सहभाग घेतला.