मनपा अधिकाऱ्यांद्वारे गणेश मूर्तींची तपासणी.

पीओपी मुर्तीबंदीस सर्वांचे सहकार्य

चंद्रपूर  : शहरामध्ये पीओपी मुर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सक्त ताकीद देण्यात आली असून अंमलबजावणीसाठी तपास मोहीम राबविल्या जात आहे. मनपा स्वच्छता वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे मुर्ती विक्रेत्यांच्या दुकानात आकस्मिक भेटी देऊन तपासणी करण्यात आली.

शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरु असून श्रीगणेश मुर्ती विक्री सुरु आहे. विक्रेत्यांची आज तपासणी केली असता एकही पीओपी मुर्ती कुठेही आढ़ळुन आली नाही. तपासणी पथकाद्वारे विक्रेत्यांचे नोंदणी प्रमाणपत्र तपासण्यात आले तसेच नोंदणी प्रमाणपत्र घेणे बाकी असलेल्या मूर्तिकार यांना त्वरित नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मुर्तींवर पूर्णतः बंदी आहे. त्यात पीओपी मुर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री न करणे आदी बाबींचा समावेश आहे. याबाबतीत महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात शहरातील सर्व मुर्तीकारांची बैठकही घेण्यात आली होती. या नियमांचे कडेकोट पालन व्हावे, या दृष्टीने पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. दुकानात पीओपी मुर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके, मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे,प्रदीप मडावी,स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार,उदय मैलारपवार,अनिरुद्ध राजूरकर, महेंद्र हजारे, अनिल ढवळे यांनी गणपती मूर्तीची पाहणी करून काही नमुने घेतले असुन गणपती मुर्ती पीओपीची आढळल्यास सक्त कारवाई करण्याच्या दृष्टीने अशी तपासणी शहरात ठिकठिकाणी केली जात आहे.त्यामुळे कुठेही पीओपी मुर्ती विक्री, साठा व खरेदी करू नये असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपुरात गणेश विसर्जनासाठी झोननिहाय ३५० कृत्रिम तलाव.

Tue Aug 30 , 2022
नागपूर – उदयापासून सुरू होणा-या गणेशउत्सवानिमीत्त, नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात झोननिहाय गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; यंदा गणेश विसर्जनासाठी ३५० कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरात झोननिहाय विविध भागात, कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. तसेच चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात येणार आहेत. शहरातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!