– तांत्रिक अप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशन मध्ये प्रवेश
नागपूर :- महाराष्ट्रामध्ये तिन्ही विज कंपनी स्तरावरील कंत्राटी कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या तांत्रिक कामगार युनियन 5059 प्रणित तांत्रिक अप्रेंन्टीस्, कंत्राटी कामगार असोसिएशन मध्ये अहमदनगर जिल्हयातील 350 कंत्राटी कामगारांचा 19 मे 2024 रोजी प्रवेश सोहळा संपन्न झाला असल्याची माहीती तांत्रिक अप्रेंन्टीस, कंत्राटी कामगार असोसिएशन चे राज्यकार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे.
या महाप्रवेश सोहळा कार्यकमाचे अध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी भुषवले तर प्रमुख अतिथी म्हणून तांत्रिक कामगार युनियनचे मार्गदर्शक ईब्राहिम हवालदार केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर. पवार सतिश भुजबळ, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस संजय उगले, राज्य सचिव आनंद जगताप, आर आर ठाकुर संजय पाडेकर, प्रदीप पाटील, पांडुरंग पोटे , अनिल चव्हाण, सचिन चोरगे, तांत्रिक अप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य सरचिटणीस शेख राहील, अतुल पाटील थेर, प्रताप खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
महामानवाच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्जलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे यांनी राज्यातील कंत्राटी कामगारांचे होणारे शोषन यापुढे होणार नाही तसेच कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटना आक्रमक भुमिका घेवुन वेळ पडल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा मार्ग स्विकारेल. कंत्राटी कामगारांनी आता हक्काच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांना निश्चितच न्याय मिळेल असे आश्वासित केले. केंद्रीय उपाध्यक्ष बी. आर. पवार यांनी मनोगत व्यक्त करताना कंत्राटी कामगार हा विज कंपनीचा महत्वाचा भाग आहे. आज कंत्राटी कामगाराची ताकद विज क्षेत्रावर प्रभाव टाकणारी आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी आपली ताकद ओळखावी तसेच न्याय हक्काच्या लढाई मध्ये सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन केले. उपाध्यक्ष सतिश भुजबळ यांनी मनोगत व्यक्त करताना कंत्राटी कामगारांच्या पाठीशी तांत्रिक कामगार युनियनची ताकद उभी राहणार असल्याचे नमुद केले. आता या पुढे कंत्राटी कामगारांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होणार नाही कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्याची ताकद फक्त तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशन मध्ये असल्याचे प्रतिपादन केले. उपसरचिटणीस संजय उगले यांनी अहमदनगर जिल्हा हा नवनविन इतिहास घडविण्यासाठी प्रसिध्द आहे. त्याच पध्दतीले आज कंत्राटी कामगारांचा महाप्रवेश सोहळा घेवुन पुन्हा इतिहास घडविला आहे. इतर जिल्हयाने सुध्दा याच पध्दतीने कार्य करण्याचे आवाहन केले. राज्य संघटक आर. आर. ठाकुर यांनी अहमदनगर जिल्हयातील कंत्राटी कामगारांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून लवकरच अहमदनगर जिल्हयातील कंत्राटी कामगाराच्या प्रश्नाकरीता संघटना लढा उभारेल असे आश्वासित केले. राज्य सचिव आंनद जगताप, प्रदिप पाटील, शेख राहील, प्रताप खंदारे अतुल पाटील आदीनी मार्गदर्शन केले. तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस तथा अप्रेंन्टीस् व कंत्राटी कामगार असोशियनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगारांची हमी ,कंत्राटी कामगारांना भरती प्रक्रियेत आरक्षण, पदभरतीमध्ये शतप्रतिशत कंत्राटी कामगारांना सामावुन घेणे, विमा संरक्षण, नियमित कामगारांप्रमाणे सुविधा व आर्थीक लाभ, कल्याण मंडळाची स्थापना, होणारी आर्थीक पिळवणुक, परिक्षेमध्ये अतिरिक्त वाढीव मार्क, शिकाऊ उमेदवारांना वाढीव आरक्षण, कंत्राटी कामगारांच्या सेवा काळाप्रमाणे वयोमर्यादेमध्ये सुट व ईतर प्रश्न हे शासन स्तरावर प्रलंबित आहे. राज्यातील कंत्राटी कामगार हा कायम कामगारांप्रमाणे काम करतो वेळप्रसंगी प्राणाची आहुती देतो अशा कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकरीता शासन व प्रशासन उदासिन असते परंतु सन 2008 पासुन कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकरीता सर्वात जास्त आंदोलन करणारी कंत्राटी कामगार असोसिएशन आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न संघर्षाच्या माध्यमातुन सोडविण्यात येईल तसेच कंत्राटी कामगारांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या काळातील येत असलेल्या आवाहनाकरीता तयार राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विक्की कावळे यांनी कंत्राटी कामगारांचे होत असलेले शोषण थांबविण्याकरीता आता कंत्राटी कामगार असोसिएशनच्या वेगळया पध्दतील काम करणार आहे. कंत्राटी कामगार हा विज क्षेत्राचा आत्मा आहे. त्यांची पिळवणुक ही शासन व प्रशासनाला परवडणारी नाही. आता त्यांना न्याय द्यावाच लागणारच कारण आता कामगारांची बलाढ्य शक्ती पुढे शासनाचा निभाव लागणार नसल्याचे नमुद केले. तांत्रिक अप्रेंन्टीस, कंत्राटी कामगार असोशियन हि विज क्षेत्रातील बलाढय कंत्राटी कामगारांची चळवळ असल्याचे नमुद केले. कार्यकमाचे प्रास्ताविक केद्रींय उपाध्यक्ष सतिश भुजबळ तर सुत्र संचालन शंकर जारकंड यांनी केले. यावेळी 350 कंत्राटी कामगारांचा प्रवेश संपन्न झाला. कार्यकमाला शेकडो कंत्राटी कामगार उपस्थित होते. कार्यकम यशस्वी करण्याकरीता तांत्रिक कामगार युनियन चे अहमदनगर जिल्हाच्या सर्व स्तरावरील पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.