भारतीय टपाल विभाग, पुणे तर्फे ’महिला सन्मान बचतपत्र विशेष मोहीम’ आणि ‘महादेव कोळी आदिवासी समूह’ या विषयावरील विशेष पाकिटाचे अनावरण

खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते महिला सन्मान बचतपत्र धारक महिला ग्राहकांचे तसेच उत्कृष्ठ वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या अधिकारी – कर्मचारी वर्गाचे कौतुक

तीन दिवसात 10 हजाराहून अधिक बचतपत्र खाती उघडण्याचा पूर्व विभाग पुणे टपाल कार्यालयाचा विक्रम

पुणे :- पुणे शहर टपाल विभागातर्फे आज “महिला सन्मान बचत पत्र” (MSSC) खाते उघडण्याच्या मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात “महिला सन्मान बचत पत्र विशेष मोहीम” आणि ‘महादेव कोळी आदिवासी समूह’ भारतीय टपाल विभाग, पुणे क्षेत्रद्वारे विशेष आवरण/पाकिटाचे (Special Cover) अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर उपस्थित होते.

देशातील महिलांची आर्थिक समृद्धी खात्रीने करण्यासाठी, भारत सरकारने 1 एप्रिल 2023 पासून “महिला सन्मान बचत पत्र” योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पुणे पोस्टल रिजनने दिनांक 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये 31,615 “महिला सन्मान बचत पत्र” खाती उघडली आहेत. ज्याची गुंतवणूक सुमारे 237 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पुणे शहर पूर्व विभागाने “महिला सन्मान बचत पत्र” खाते उघडण्यासाठी दिनांक 23 ते 26 जून 2023 या तीन दिवसांची विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत तब्बल 10,430 खाती उघडली आहेत, ज्यांची गुंतवणूक रक्कम 39 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा एक विक्रम आहे.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रकाश जावडेकर यांनी भारतीय टपाल विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. “महादेव कोळी” जमाती वरती विशेष आवरण काढून टपाल विभागाने आदिवासी समाज बांधवांना एका वेगळ्या प्रकारे सन्मानित केल्याचे नमूद केले. टपाल विभागाच्या पुणे पोस्टल रिजनने अल्पावधीत हजारोंच्या संखेने महिलांची “महिला सन्मान बचत पत्र” खाते उघडून एक प्रकारे या सर्व महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम केल्याचे नमूद केले. “महिला सन्मान बचत पत्र” म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेली ही विशेष योजना असून सदर योजना हजारो महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम भारतीय टपाल विभाग करीत असल्याचे नमूद केले.

पोस्ट खात्याने विविध योजना आणल्या आहेत. पोस्टात आता विमा, आधार कार्ड, पासपोर्ट मिळत आहे. आपले पोस्टमन डिजिटल झाले आहेत.भारतातील UPI प्लॅटफॉर्मने डिजीटल आर्थिक व्यवहारात अमेरिकेलाही मागे टाकले आहे. पोस्ट विभागाने महिला सन्मान बचतपत्र अभियान अतिशय उत्तम राबवले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला माधुरी मिसाळ, आमदार, पर्वती मतदारसंघ, पुणे, संग्राम गायकवाड, आयकर आयुक्त, पुणे, रामचंद्र जायभाये, पोस्टमास्तर जनरल, पुणे आणि  सिमरन कौर, संचालक टपाल सेवा, पुणे क्षेत्र इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आरक्षण आणि कल्याण याविषयीच्या मुद्यांसंदर्भात ओएनजीसी व्यवस्थापनासोबत घेतली बैठक

Sat Jul 15 , 2023
मुंबई :- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) ने ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) च्या व्यवस्थापनासोबत बैठक घेतली. मुंबईत झालेल्या या बैठकीचे उद्दिष्ट, ओएनजीसीमधील अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे, हे होते. त्यात अनुसूचित जाती कर्मचाऱ्यांचे आरक्षण, रिक्त पदांचा अनुशेष, कल्याणकारी उपाय, तक्रार निवारण यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com