– पारंपरिक औषध प्रणालींमध्ये “ॲक्ट ईस्ट पॉलिसी” च्या विस्तारासाठी आयुषमध्ये अभूतपूर्व क्षमता : केंद्रीय आयुष मंत्री
नवी दिल्ली :- भारताचे परराष्ट्र मंत्रालय, आसियान मधील भारतीय दूतावास आणि आसियान सचिवालयाच्या सहकार्याने आयुष मंत्रालयाने 20 जुलै 2023 रोजी आसियान देशांसाठी, नवी दिल्लीत पारंपारिक औषधांवरील परिषद आयोजित केली आहे.
भारत आणि आसियान देशांमधील व्यासपीठ बळकट करण्याच्या दृष्टीने पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात या देशांमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि भविष्यातील सहकार्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करणे हे या पारंपरिक औषधांवरील परिषदेचे उद्दिष्ट आहे.
“भारत आणि आसियान मधील बहुआयामी संबंध हे समान भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांच्या मजबूत पायावर उभे असून हे संबंध दोन हजार वर्षांहून अधिक जुने आहेत.” असे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांना संबोधित करत होते.
“म्यानमार येथे नोव्हेंबर 2014 मध्ये 12 व्या आसियान भारत शिखर परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ घोषित केली, यामुळे धोरणात्मक सहकार्याला एक नवी गती मिळाली. जवळपास दशकभरानंतर पारंपरिक औषधांवरील भारत आसियान परिषद आयोजित केली जात आहे, हे भारताचे आसियानसोबतचे सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.”, असे त्यांनी सांगितले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आयुष विभागाचे स्वतंत्र आयुष मंत्रालयात रूपांतर केल्यानंतर 2014 सालापासून गेल्या 9 वर्षांत आयुष क्षेत्राची अनेक पटीने वाढ झाली आहे, असे सोनोवाल यांनी आयुष मंत्रालयाच्या कामगिरीबद्दल तपशील सादर करताना सांगितले. मधुमेह, कर्करोग, मानसिक आरोग्य यांसारख्या विविध असंसर्गजन्य रोग तसेच कोविड सारख्या संसर्गजन्य रोगांच्या उपचार आणि प्रतिबंधाच्या दृष्टीने, आयुष प्रणालीवर उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी सद्यस्थितीत आयुष मंत्रालय ब्रिटन, अमेरिका , जपान, ब्राझील, जर्मनी या देशांमधील अनेक उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच