पाच प्रकारच्या स्पर्धा; प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत १५ मार्च २०२२ पर्यंत
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, आकर्षक रोख पारितोषिके मिळवा
सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी, भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य–एकामताचे सामर्थ्य”ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित करुन निवडणुक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून त्यांच्या सक्रिय सहभागातून लोकशाही बळकट करत आहे. यामध्ये सर्व वयोगटांना सहभागी होता येणार आहे. सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व विशद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकूरांचा गौरव करणे, असा यामागील उद्देश आहे.
१- मध्यवर्ती संकल्पना :-“माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य”
२ राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत ५ प्रकारच्या स्पर्धा होत आहेत:- प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्र स्पर्धा.
क- प्रश्नमंजूषा स्पर्धा: प्रश्नमंजूषा स्पर्धा ही जिज्ञासू मनांना सहभागी करून त्यांची निवडणुकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेमध्ये ३ स्तर असतील (सुलभ, मध्यम आणि अवघड). स्पर्धेच्या तीनही स्तरांची पूर्तता केल्यास सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
ख-घोषवाक्य स्पर्धा: या स्पर्धेत सहभागी व्हा आणि दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर तुमचे शब्द गुंफून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आकर्षक घोषवाक्य तयार करा.
ग- गीत स्पर्धा: शास्त्रीय, समकालीन आणि रॅप इत्यादीसह कोणत्याही स्वरूपातील गीताच्या माध्यमातून स्पर्धकाच्या सर्जनशील मनाची प्रतिभा आणि क्षमता जोखणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. सहभागी स्पर्धक दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर मूळ गीतरचना तयार आणि शेअर करू शकतात. कलाकार आणि गायक त्यांच्या आवडीचे कोणतेही वाद्य वापरू शकतात. गाण्याचा कालावधी तीन मिनिटांपेक्षा जास्त नसावा.
घ- व्हिडिओ मेकिंग स्पर्धा: व्हिडिओ मेकिंग स्पर्धेतून कॅमेराप्रेमींना भारतीय निवडणुकांचा उत्सव आणि त्यातील विविधता साजरी करणारा व्हिडिओ (चित्रफीत) तयार करण्याची संधी मिळते. स्पर्धेच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त, खालील विषयांवर देखील सहभागी स्पर्धक व्हिडिओ बनवू शकतात-: माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाचे महत्त्व (प्रलोभनमुक्त मतदान); मतदानाची शक्ती-: महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्त्व प्रदर्शित करणे. सहभागी स्पर्धकांना वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर केवळ एक मिनिट कालावधीचा व्हिडिओ करायचा आहे.
व्हिडिओ, गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीनुसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.
ड – भित्तिचित्र स्पर्धा: वरील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आणि विचारप्रवर्तक अशी भित्तिचित्रे तयार करू शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. सहभागी स्पर्धक डिजिटल भित्तीचित्र, आरेखन किंवा रंगवलेली भित्तिचित्रे पाठवू शकतात. भित्तिचित्रांचे रेझोल्यूशन (रंगकणांचे पृथक्करण) चांगले असले पाहिजे.
३- स्पर्धा श्रेणी:-
- संस्थात्मक श्रेणी- शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल.
- व्यावसायिक श्रेणी- ज्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र असा आहे किंवा गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र याच्याशी संबंधित एखादे काम हा जिच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- हौशी श्रेणी- हौशी: जी व्यक्ती गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतु तिच्या/ त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यमांतून असतो तिला ‘हौशी’ म्हणून गणण्यात येईल.
४ – पुरस्कार आणि सन्मान:-
गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जातील. याव्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके दिली जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये ४ विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी ३ विशेष उल्लेखनीय पारितोषिके दिली जातील.
क- गीतस्पर्धा
श्रेणी | पहिले बक्षिस | दुसरे बक्षिस | तिसरे बक्षिस | विशेष उल्लेखनीय |
संस्थात्मक | १,००,००० | ५०,००० | ३०,००० | १५,००० |
व्यावसायिक | ५०,००० | ३०,००० | २०,००० | १०,००० |
हौशी | २०,००० | १०,००० | ७,५०० | ३,००० |
ख- व्हिडीओ मेकिंग स्पर्धा
श्रेणी | पहिले बक्षिस | दुसरे बक्षिस | तिसरे बक्षिस | विशेष उल्लेखनीय |
संस्थात्मक | २,००,००० | १,००,००० | ७५,००० | ३०,००० |
व्यावसायिक | ५०,००० | ३०,००० | २०,००० | १०,००० |
हौशी | ३०,००० | २०,००० | १०,००० | ५,००० |
ग- भित्तिचित्रस्पर्धा
श्रेणी | पहिले बक्षिस | दुसरे बक्षिस | तिसरे बक्षिस | विशेष उल्लेखनीय |
संस्थात्मक | ५०,००० | ३०,००० | २०,००० | १०,००० |
व्यावसायिक | ३०,००० | २०,००० | १०,००० | ५,००० |
हौशी | २०,००० | १०,००० | ७,५०० | ३,००० |
* सर्व आकडे भारतीय रुपयांमध्ये आहेत.
घ- घोषवाक्य स्पर्धा:
प्रथम पारितोषिक- रू. २०,०००/-, द्वितीय पारितोषिक- रू. १०,०००/-, तृतीय पारितोषिक- रू. ७,५००/-. सहभागी होणाऱ्यांपैकी ५० स्पर्धकांना प्रत्येकी रू. २,०००/- विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणून देण्यात येतील.
ड- प्रश्नमंजूषा स्पर्धा:
विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येतील. तसेच तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना इ-प्रमाणपत्रे देण्यात येतील.
५- ज्युरी
विविध श्रेणींमधील प्रवेशिका भारत निवडणूक आयोगाद्वारे गठित परीक्षण मंडळाकडे पाठवण्यात येतील आणि विजयी प्रवेशिकांची निवड करण्यात येईल. पुनर्मूल्यांकनाच्या दाव्यांशी संबंधित विनंत्यांचा विचार केला जाणार नाही.
६- कसे सहभागी व्हावे
- स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळhttps://ecisveep.nic.in/contest/येथेभेटद्यावी..
- स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.inइथे ईमेल कराव्यात. ईमेल करतांना स्पर्धेचे नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा.
- प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी.
सर्व प्रवेशिका १५ मार्च २०२२ पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.inया ईमेलवर पाठवण्यात याव्या.
QR कोड
स्पर्धेच्या संकेत स्थळाला भेट देण्यासाठी स्कॅन करा
भारताच्या पहिल्या मतदार जागृती स्पर्धेत आता सहभागी व्हा. भित्तिचित्र, गीत, व्हिडिओ, घोषवाक्य आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://ecisveep.nic.in/contest/वर लॉग इन करा. तुमच्या प्रवेशिका voter-contest@eci.gov.inयेथे १५ मार्च २०२२ पूर्वी पाठवा.
राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा
महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या संदेशांचा मसुदा
१ एका परिवर्तन दूताची भूमिका बजावण्याची तुमची तयारी आहे का? तुम्ही देखील कशा प्रकारे एक परिवर्तनकारक बनू शकता आणि त्यासाठी तुमच्या प्रतिभेचा एक साधन म्हणून कशा प्रकारे वापर करू शकता हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तर मग निवडणूक आयोगाकडे तुमच्यासाठी एक आकर्षक संधी आहे. प्रत्येक मताच्या महत्त्वाचा नावीन्यपूर्ण अभिव्यक्तीच्या माध्यमातून पुनरुच्चार करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य – एकामताचे सामर्थ्य’ यावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. तुमची गुणवत्ता आणि सर्जनशीलता यांच्या मदतीने तुमच्या सक्रीय सहभागाद्वारे लोकशाही बळकट करण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. मग या स्पर्धा कोणत्या आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? या पाच स्पर्धा आहेत प्रश्नमंजूषा स्पर्धा, व्हिडिओ निर्मिती स्पर्धा, भित्तिचित्रस्पर्धा, गीत स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा. या स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या आहेत. तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी १५ मार्च २०२२ ही अंतिम तारीख आहे. यासाठी ecisveep.nic.in/contest/ येथे किंवा निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलला भेट द्या. मग वाट कसली पाहाताय? लगेच सहभागी व्हा आणि देशासमोर तुमच्या गुणवत्तेचे दर्शन घडवा.
२- देशातील सर्वात मोठ्या स्पर्धेविषयी तुम्ही काही ऐकले आहे का? नाही! तर मग या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचे आहे की भारत निवडणूक आयोगाने ‘ माझे मत माझे भविष्य – एकामताचेसामर्थ्य’ यावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा, व्हिडिओ निर्मिती स्पर्धा, भित्तिचित्र स्पर्धा, गीत स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. तर मग एक परिवर्तन घडवण्यासाठी गीतेगाण्यास किंवा कॅनवासवर आपल्या कल्पना उतरवण्यास काय हरकत आहे? तुमच्या कल्पकतेला बोलू द्या. तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी १५ मार्च २०२२ ही अंतिम तारीख आहे. यासाठी ecisveep.nic.in/contest/ येथे किंवा निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलला भेट द्या.
३- तुमची प्रतिभा कशा प्रकारे एक मोठा बदल घडवू शकते हे तुम्हाला ठाऊक आहे का? मग तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. भारत निवडणूक आयोगाने ‘ माझे मत माझे भविष्य – एकामताचेसामर्थ्य’ यावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा, व्हिडिओ निर्मिती स्पर्धा, भित्तिचित्र रचना स्पर्धा, गीत स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. तर मग तुमची प्रतिभा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू दे आणि केवळ इतकेच नाही तर आकर्षक बक्षिसेसुद्धा मिळवा. मग आता वाट कसली पाहाताय?
तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी १५ मार्च २०२२ ही अंतिम तारीख आहे हे विसरू नका. अधिक माहितीसाठी ecisveep.nic.in/contest/ येथे किंवा निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलला भेट द्या.
स्पर्धा- अभिनेता/ गायक/क्रीडापटू/PwD
अभिनेता- व्हिडिओ स्पर्धा
- सामाजिक बदल घडवण्यासाठी एक साधन म्हणून समाजात व्यक्तींवर किती प्रमाणात प्रभाव निर्माण करू शकतो यावर व्हिडिओची भूमिका निश्चित करता येते. आणि याविषयी तुमच्या- माझ्यापेक्षा जास्त चांगले कोणाला माहीत असेल. तर जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यामुळे लोक मतदानासाठी घराबाहेर पडावेत यासाठी तुमचा एखादा व्हिडिओ का असू नये. यासाठीच तुमच्यासाठी माझ्याकडे एक खूपच चांगला प्रस्ताव आहे ज्यामध्ये तुमच्यातील सर्जनशीलतेचे योगदान तुम्ही सामाजिक परिवर्तनासाठी देऊ शकता. सर्जनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रत्येक मताच्या महत्त्वाचा पुनरुच्चार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य – एकामताचे सामर्थ्य’ यावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या आहेत. तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी १५ मार्च २०२२ ही अंतिम तारीख आहे. यासाठी nic.in/contest/ येथे किंवा निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलला भेट द्या. मग वाट कसली पाहाताय? लगेच सहभागी व्हा आणि देशासमोर तुमच्या गुणवत्तेचे दर्शन घडवा.
गायक- गीत स्पर्धा Song Contest
- नमस्कार मित्रमैत्रिणींनो! तुमच्या संगीताच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी जोडले जाण्याची अतिशय आकर्षक संधी मी घेऊन आलो आहे. सध्या देशातील सर्वात मोठ्या गीत स्पर्धेविषयी तुम्ही ऐकले आहे का? भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने ‘माझे मत माझे भविष्य– एकामताचे सामर्थ्य’ यावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या आहेत. तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी १५ मार्च २०२२ ही अंतिम तारीख आहे. यासाठी nic.in/contest/ येथे किंवा निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलला भेट द्या. मग वाट कसली पाहाताय? लगेच सहभागी व्हा आणि देशासमोर तुमच्या गुणवत्तेचे दर्शन घडवा.