मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्वातंत्र्य दिन साजरा

नागपूर :- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी न्या. अविनाश घरोटे, न्या. अनिल किलोर, न्या. एन.आर. बोरकर, न्या. श्रीमती एम. एस. जवळकर, न्या. जी.एस. सानप, न्या. ए. एल. पानसरे, न्या. एम. डब्लु. चांदवानी, न्या. एस. ए. देशमुख न्या. व्रुषाली जोशी व न्या. अभय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्याचप्रमाणे प्रबंधक श्री रविंद्र सादरानी, बार असोशिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, मुख्य सरकारी वकील डि.व्ही. चव्हाण, केंद्र सरकारचे मुख्य वकील एन.एस. देशपांडे, तसेच न्यायीक अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. 

जिल्हा व सत्र न्यायालयात ध्वजारोहण

– भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयात आज ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी न्यायाधीश वृंद,  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र  दिनाच्या 77  व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण केले. अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. डॉ. इटनकर यांनी यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाधिक वेळ द्या! - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

Fri Aug 16 , 2024
– महसूल पंधरवड्याची सांगता – उत्कृष्ट अधिकारी व कर्मचा-यांचा सन्मान नागपूर :- सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल कार्यालयाशी नियमित संबंध येतो. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांसाठी ॲक्सेसिबल अर्थात अधिकाधिक उपलब्ध राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे केल्या. दि. 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या महसूल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com