– शासनाचे लक्ष केंदित करण्यासाठी राकाँ (शरद पवार पक्ष) विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांचा अनोखा एल्गार
भंडारा :- भंडारा शहरातील खड्डयात गेल्या दोन वर्षात ५ ते १० नागरिकांचे जीव गेले. जीव गेल्यानंतर जेल रोड वरील रस्ता तयार करण्यात आला. याच प्रकारे जे एम पटेल रोडवर पडलेले मोठमोठे भगदाळामुळे अनेक लोक किरकोळ जखमी देखील झाले असल्याच्या तक्रारी आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी सदर रस्त्यावरील खड्डयांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अजब प्रकार करुन एक अनोखा एल्गार पुकारला.
दि.१४ मे रोजी स्थानिक मुस्लिम लायब्ररी चौकासमोरील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवर रांगोळी काढून खड्डयातच बसून गांधीगिरी करत हे नवखे एल्गार पुकारुन शासनाचे लक्ष वेधले आहे.
निवडणूक सुरू असल्याने सध्या आचारसंहिता लागू असल्याने कोणतेही मोठे आंदोलन करता जरी येत नसले तरी सामान्य जनतेचे प्राण वाचविण्यासाठी शरद पवार गटातील भंडारा विधानसभा अध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन खड्डयात रांगोळी काढत खड्यातच बसून वारंवार रस्ता तयार करून पुन्हा त्याच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने सदर रस्त्यावरील बांधकाम करणार्या कंत्राटदार यांच्यावर चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी देखील मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यानी केली आहे. या नवख्या आंदोलनात त्यांच्यासह चंद्रशेखर खोब्रागडे व राकेश शामकुवर उपस्थित होते.
रामेश्वर काळे(केशवनगर खात रोड भंडारा) – मी भंडारा येथील रहिवासी आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याच्या टाकीचा (जेल रोड) रोड तसेच जे.एम.पटेल कॉलेज रोड, जिल्हा परिषद चौक, लालबहादूर शास्त्री चौक भंडाराचे रस्ते खूपच खराब आहे. याकडे आमदार-खासदारांचे नेहमी दुर्लक्ष असते. त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग हाच असूनसुध्दा त्यांच्या लक्षात येत नाही, हीच भंडारा शहरातील दुर्दैवी बाब समजावी.